विराटनंतर हा क्रिकेटरही अडकणार लग्नबंधनात, हवेत केले गर्लफ्रेंडला प्रपोज

विराटनंतर आणखी एक भारतीय खेळाडू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा फोटो शेअऱ केलाय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 06:45 PM2017-12-31T18:45:42+5:302017-12-31T18:45:54+5:30

whatsapp join usJoin us
The cricketer will be involved in the wedding after Virat, Proposal for the girlfriends in the air | विराटनंतर हा क्रिकेटरही अडकणार लग्नबंधनात, हवेत केले गर्लफ्रेंडला प्रपोज

विराटनंतर हा क्रिकेटरही अडकणार लग्नबंधनात, हवेत केले गर्लफ्रेंडला प्रपोज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. विराटनंतर आणखी एक भारतीय खेळाडू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणारा मयांक अग्रवाल लवकरच लग्न करणार आहे. मयांकनं इनस्टाग्राम पोस्टद्वारे याचे संकेत दिले आहेत. 26 वर्षीय मयांकने खास शैलीत आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. शनिवारी मयांकने इन्स्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा फोटो शेअऱ केलाय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मयांकने प्रेमाच्या दुनियेतही बाजी मारली आहे. मयांकने लंडन आय येथे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. शनिवारी त्याने हा फोटो चाहत्यांसाठी शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना तो म्हणाला, ती मला हो म्हणालीये. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाहीये. आमच्या दोघांसाठी हा क्षण नेहमीच ताजातवाना राहील.   

रणजीच्या 2017 या  सीझनचा मयांक हिरो ठरलाय. मयांकने या सीझनध्ये सर्वाधिक 1160 धावा ठोकल्या. हे वर्ष आणि नोव्हेंबर महिना त्याच्यासाठी खास ठरलाय. त्यानंतर डिसेंबर महिना त्याच्यासाठी खास प्रेमाचा ठरला असे म्हणायला हरकत नाही. 

Web Title: The cricketer will be involved in the wedding after Virat, Proposal for the girlfriends in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.