सुपर ओव्हरची संकल्पना योग्य ठरली

शानदार! काय अंतिम लढत झाली! रविवारी लॉर्ड्सवर झालेली अंतिम लढत खरच शानदार होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:50 AM2019-07-16T03:50:48+5:302019-07-16T03:50:56+5:30

whatsapp join usJoin us
The concept of Super Over was right | सुपर ओव्हरची संकल्पना योग्य ठरली

सुपर ओव्हरची संकल्पना योग्य ठरली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
शानदार! काय अंतिम लढत झाली! रविवारी लॉर्ड्सवर झालेली अंतिम लढत खरच शानदार होती. नक्कीच, न्यूझीलंड व इंग्लंड संघांनी शानदार खेळ सादर केला, पण दुर्दैवाने शेवटी कुणी एकच विजेता जाहीर करावा लागतो आणि दुसऱ्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते. पण, विलियम्सन अँड कंपनीने क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मी नेहमीच न्यूझीलंड क्रिकेटचा फॅन राहिलो आहे आणि विश्वचषकामध्ये नैतिक मूल्य, इच्छाशक्ती आणि खेळाप्रती असलेले समर्पण यामुळे त्यांना वरचे स्थान गाठून दिले आहे. महतप्रयासाने संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले, पण प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये निर्णायक क्षणी आपल्या कामगिरीत उल्लेखनीय सुधारणा करताना संघाने लढवय्या खिलाडूवृत्तीचा परिचय दिला.
कर्णधार केन विलियम्सनने संघाला योग्य पद्धतीने सांभाळले. दरम्यान, त्याला फलंदाजांकडून अपेक्षित सहकार्य लाभले नाही, पण गोलंदाजांनी मात्र शानदार कामगिरी केली. संघाला या धक्यातून सावरण्यासाठी प्रदीर्घवेळ लागेल, हे खरे आहे, पण एक मजबूत संघ म्हणून ते यातून सावरतील, असा मला विश्वास आहे.
इंग्लंडला सुरुवातीपासून जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते आणि त्यांनी पहिले जेतेपद पटकावण्याच्या दर्जाची कामगिरीही केली. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर संघाने विश्वचॅम्पियन होण्याच्या दिशेने तयारी सुरू केली होती. त्याचे सर्व श्रेय इयोन मॉर्गन व त्यांच्या नेतृत्व क्षमतेला द्यायला हवे. विश्वचषक स्पर्धेत जेतेपद एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी योजनाबद्ध मेहनतीची गरज असते.
या स्पर्धेत बेन स्टोक्सची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जोस बटलरसोबतची शतकी भागीदारी संपुष्टात आल्यानंतरही स्टोक्सच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकत होता. त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खराब कालखंडातून शानदार पद्धतीने पुनरागमन केले.
मी सुपर ओव्हरच्या संकल्पनेने खूश आहे. दरम्यान, विजेतेपदाचा निर्णय चौकारांच्या संख्येऐवजी अन्य निकषांवर निश्चित व्हायला हवा होता. कदाचित ‘बळी मिळवणे’ किंवा लीग फेरीतील संघांच्या कामगिरीच्या आधारावरही निर्णय घेता आला असता. पण, स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने करण्याचा निर्णय प्रशंसनीय ठरला. अव्वल चार संघ चमकदार कामगिरी करीत उपांत्य फेरीत दाखल झाले. यापेक्षा विश्वचषक स्पर्धेचा रोमांच आणखी चांगला कसा राहू शकला असता ?

Web Title: The concept of Super Over was right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.