चेन्नई आत्मविश्वासात, तर दिल्ली गोलंदाजीत पुढे

कोलकाता नाईट रायडर्सने पाठोपाठ दोन सामने गमविल्यानंतर पुढील लढतीत पराभवाची मालिका खंडित करण्याची धडपड असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 02:38 AM2019-04-14T02:38:11+5:302019-04-14T02:38:52+5:30

whatsapp join usJoin us
Chennai confidently, while in Delhi bowling attack | चेन्नई आत्मविश्वासात, तर दिल्ली गोलंदाजीत पुढे

चेन्नई आत्मविश्वासात, तर दिल्ली गोलंदाजीत पुढे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर लिहितात...
कोलकाता नाईट रायडर्सने पाठोपाठ दोन सामने गमविल्यानंतर पुढील लढतीत पराभवाची मालिका खंडित करण्याची धडपड असेल. त्रिनिदादचा फिरकीपटू सुनील नरेन याच्या अनुपस्थितीत केकेआर संघ बॅकफूटवर आला आहे. नरेनमुळे केकेआरच्या फलंदाजीला आणि गोलंदाजीला बळ लाभायचे. सुरुवात चांगली होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खालच्या स्थानावर येणाऱ्या रसेलसारख्या धडाकेबाज फलंदाजाला मुक्तपणे फटकेबाजीची मोकळीक मिळू शकते. शुभमानला बढती देण्याची युक्ती लाभदायी ठरली. शिवाय उथप्पा फटके बाजी करतो त्यावेळी केकेआरचा धावफलक सारखा हलता राहतो. तथापि दिनेश कार्तिकचे अपयश प्रामुख्याने जाणवले. तो जेव्हा- जेव्हा योगदान देतो तेव्हा संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होते, हे पाहण्यात आले आहे.
केकेआरची गोलंदाजी देखील चिंता वाढविणारी आहे. कुलदीप यादवचा अपवाद वगळता प्रसिद्ध कृष्णा याने भरपूर धावा दिल्या. रसेलला देखील लय गवसलेली दिसत नाही. पीयूष चावला हा देखील लढतीत रंगत आणू शकतो, त्यामुळे त्याच्याकडूनही बºयाच आशा आहेत.
चेन्नई संघ गुणतालिकेत अव्वल असून आत्मविश्वासातही पुढे आहे. डेथ ओव्हरमध्ये उत्तम कामगिरीमुळेच हा संघ इतर संघांच्या तुलनेत उत्कृष्ट ठरतो. अटीतटीच्यावेळी सीएसके सर्व अनुभव पणास लावतो. स्वत: धोनी अडथळ्यांवर मात करीत असल्याने त्याचा संघ सामन्यागणिक विजयी होऊन अव्वल स्थान गाठण्यात यशस्वी ठरला.
सनरायझर्स- कॅपिटल्स हा सामना देखील उत्कंठापूर्ण होणार आहे. शिखर धवनच्या झुंजार नाबाद खेळीच्या बळावर दिल्लीने केकेआरला नमवून आम्ही देखील मागे नसल्याची झलक दाखविली. शिखरसोबत श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे दोघे फलंदाजीत चांगली कामगिरी करीत आहेत. दिल्लीची गोलंदाजीही सामन्यात फरक निर्माण करणारी आहे.
खेळपट्टीची साथ मिळाल्यास दिल्लीचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखू शकतात. ईशांत, रबाडा आणि मॉरिस यांचा वेगवान माराविरुद्ध सनरायजर्सचे सलामीवीर डेव्हिड वॉनर- जॉनी बेयरेस्टो असा संघर्ष यानिमित्ताने अनुभवायला मिळेल. सनरायजर्सने नेहमीसारखी सुरुवात केल्यास सामना मोठ्या धावसंख्येचा होईल, असा अंदाज आहे.

Web Title: Chennai confidently, while in Delhi bowling attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.