कॅरेबियन खेळाडूंना पवित्रा बदलावा लागेल; राहुलला कायम ठेवायचे की मयंक अग्रवालला संधी द्यायची ?

पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर थोड्याच दिवसात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होणे कठीण असते. विशेषता खराब फॉर्मात असलेल्या खेळाडूंसाठी हे मोठे आव्हान असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:31 AM2018-10-12T01:31:58+5:302018-10-12T01:32:13+5:30

whatsapp join usJoin us
Caribbean players have to change their behavior; Do you want Rahul to continuous that chance to Mayank Agarwal? | कॅरेबियन खेळाडूंना पवित्रा बदलावा लागेल; राहुलला कायम ठेवायचे की मयंक अग्रवालला संधी द्यायची ?

कॅरेबियन खेळाडूंना पवित्रा बदलावा लागेल; राहुलला कायम ठेवायचे की मयंक अग्रवालला संधी द्यायची ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर लिहितात...

पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर थोड्याच दिवसात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होणे कठीण असते. विशेषता खराब फॉर्मात असलेल्या खेळाडूंसाठी हे मोठे आव्हान असते. अशा खेळाडूंसाठी दोन कसोटी सामन्यांदरम्यान एकद्या सराव सामन्याची व्यवस्था असायला हवी. त्यामुळे आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत होते, पण दौ-याचा कार्यक्रमच अशा पद्धतीने तयार करण्यात येतो की त्यात सराव सामना खेळण्याची संधीच मिळत नाही. यात इंग्लंडसाठी चांगली बाब आहे. त्यांचे स्थानिक क्रिकेट सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर त्यांना विदेशात सराव सामने खेळण्याची पुरेशी संधी मिळते. विंडीजने दुबईत सराव केल्यानंतर राजकोट कसोटीपूर्वी दोन दिवसीय सराव सामना खेळला. पाहुणा संघ सर्वच विभागात अपयशी ठरल्याने त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. एक वेळ अशी होती १९७० किंवा १९९० च्या दशकात आघाडीवर असलेला विंडीज संघ प्रतिस्पर्धी संघांना चार दिवसांत किंवा कधी-कधी तीन दिवसांमध्ये गारद करीत होता.
केमार रोच व कर्णधार जेसन होल्डर यांच्या पुनरागमनामुळे हैदराबाद कसोटीत विंडीजची स्थिती थोडी चांगली राहू शकते. कर्णधार फिट होऊन परतत आहे. अशा स्थितीत संघाची मजबूत गोलंदाजी खेळाडूं्चे मनोधैर्य उंचावू शकते. होल्डर सातव्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करू शकतो. पण, संघाला आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. राजकोटमध्ये विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीयांपुढे गुडघे टेकवल्याचे दिसले. त्यांची फलंदाजी तर त्याहून निराशाजनक झाली. प्रत्येक फलंदाज भारतीय मा-यापुढे अपयशी ठरला. असे वाटत होते की, त्यांनी पराभव मान्य केला असून आक्रमक फटका खेळत तंबूत परतत होते. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ही बाब समजण्यासारखी आहे, पण राजकोटमध्ये अशी कुठली बाब नव्हती. हैदराबाद कसोटीत त्यांना ही मानसिकता बदलावी लागेल. अन्यथा हा कसोटी सामनाही लवकरच संपेल.
भारतीय संघ व्यवस्थापनापुढे केवळ एकच प्रश्न आहे. राहुलला कायम ठेवायचे की मयंक अग्रवालला संधी द्यायची. गोलंदाजीमध्येही अधिक बदल करण्याची गरज नाही.

Web Title: Caribbean players have to change their behavior; Do you want Rahul to continuous that chance to Mayank Agarwal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.