अन् सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन रिक्षा थेट क्रिकेटच्या मैदानात!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांनी बाजी मारली. या सामन्यात खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी स्टेडियमवर भारत आर्मी विरूद्ध दी बार्मी आर्मी असा सामनाही पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 09:55 AM2018-08-07T09:55:42+5:302018-08-07T09:56:29+5:30

whatsapp join usJoin us
The Bharat Army uses auto rickshaw to deliver drinks during cricket match | अन् सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन रिक्षा थेट क्रिकेटच्या मैदानात!

अन् सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन रिक्षा थेट क्रिकेटच्या मैदानात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांनी बाजी मारली. या सामन्यात खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी स्टेडियमवर भारत आर्मी विरूद्ध दी बार्मी आर्मी असा सामनाही पाहायला मिळाला. भारत आणि इंग्लंड यांच्या चाहत्यांच्या या गटाने आपापल्या संघांना चिअर करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. मात्र, विराट कोहलीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

इंग्लंडमध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन देणारा अधिकृत गट म्हणून भारत आर्मी ओळखला जातो. एका स्थानिक क्रिकेट सामन्यात चक्क रिक्षाने सॉफ्ट ड्रिंक्सचे वाटप केल्यामुळे भारत आर्मी चर्चेला आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सचिन तेंडुलकरपासून ते महेंद्रसिंग धोनी यांना सहका-यांसाठी सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन जाताना अनेकांनी पाहिले आहे, परंतु त्यासाठी रिक्षाचा वापर झालेला प्रथमच पाहायला मिळाले. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
 



भारत आर्मी  लॉर्ड्सवर होणा-या दुस-या कसोटीत भारतीय संघाला चिअर करताना दिसणार आहे. या कसोटीत संघात बदल अपेक्षित आहेत. शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एका खेळाडूच्या जागी चेतेश्वर पुजाराला संधी मिळण्याची शक्यता आहे.  

Web Title: The Bharat Army uses auto rickshaw to deliver drinks during cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.