भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय

दहा वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळणार आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास मनाई केल्याने त्यांना दणकाच बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:04 AM2018-11-28T10:04:30+5:302018-11-28T10:10:43+5:30

whatsapp join usJoin us
BCCI decision not to send Indian team to Pakistan for Emerging Nations Cup | भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय

भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या Emerging Nations Cup (23 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) घेतला आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळणार आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास मनाई केल्याने त्यांना दणकाच बसला आहे. 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. त्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यात आलेला नाही. भारतीय संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळेल आणि अंतिम सामनाही येथेच होणार आहे.पाकिस्तान आणि श्रीलंका यांना Emerging Nations Cup स्पर्धेचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे. कराचीत बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग आणि पाकिस्तान यांचे सामने होणार आहेत, तर कोलंबो येथे श्रीलंका, भारत, अफगाणिस्तान आणि ओमान यांच्यात लढती होतील. कोणत्याही अटींवर भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे. 

6 ते 15 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. पाकिस्तानातील सर्व सामने नॅशनल स्टेडियममध्ये होणार असून त्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे पीसीबीने सांगितले. सुरक्षेच्या कारणावरूनच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास मनाई केली आहे. त्यामुळे Emerging Nations Cup ही स्पर्धा पाकिस्तानला त्या सर्व खेळाडूंचा विश्वास जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे.
2009च्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संघाचे सर्व सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते आणि पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला होता. Emerging Nations Cup मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी ( 7 डिसेंबर ) होणार आहे. त्यानंतर ओमान ( 8 डिसेंबर) आणि श्रीलंका ( 10 डिसेंबर) यांच्याशी भारताचा मुकाबला होईल. 

स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

http://www.asiancricket.org/index.php/tournaments/acc-emerging-teams-asia-cup-2018

Web Title: BCCI decision not to send Indian team to Pakistan for Emerging Nations Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.