Ajit Wadekar: त्यांची आक्रमकता केवळ बॅट-बॉल युद्धापुरतीच...

Ajit Wadekar: भारताचे महान कर्णधार अजित वाडेकर आपल्यात नाहीत. वयाच्या शेवटपर्यंत क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले वाडेकर यांनी भारतीय संघाला परदेशात जाऊन विजय कसा मिळवायचा हे शिकवले.

By स्वदेश घाणेकर | Published: August 16, 2018 09:35 AM2018-08-16T09:35:45+5:302018-08-16T11:27:41+5:30

whatsapp join usJoin us
Ajit Wadekar: Their aggressiveness is only for bat-ball warfare ... | Ajit Wadekar: त्यांची आक्रमकता केवळ बॅट-बॉल युद्धापुरतीच...

Ajit Wadekar: त्यांची आक्रमकता केवळ बॅट-बॉल युद्धापुरतीच...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचे महान कर्णधार अजित वाडेकर आपल्यात नाहीत. वयाच्या शेवटपर्यंत क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले वाडेकर यांनी भारतीय संघाला परदेशात जाऊन विजय कसा मिळवायचा हे शिकवले. आक्रमक फलंदाज, अव्वल दर्जाचे स्लीप फिल्डर, चाणाक्ष कर्णधार, यशस्वी व्यवस्थापक आणि राष्ट्रीय सल्लागार असे वाडेकरांचे अनेक पैलू उलगडता येतील. 

१ एप्रिल १९४१ मध्ये वाडेकरांचा जन्म आणि वयाच्या ७६ व्या वर्षांपर्यंत त्यांनी मुंबई व भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. १ एप्रिल ही जन्म तारीख असल्याने ते गमतीने म्हणायचे, "या दिवशी इतरांना मी फसवणे अपेक्षित आहे, पण लोकच मला फसवण्याचा प्रयत्न करतात. " हा एकच दिवस असा होता की लोकं त्यांना फसवू शकत होती. नाहीतर त्यांची यशोगाथाच इतरांना गप्प करून जायची. १९७१ मध्ये त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली भारताला परदेशात मालिका विजय मिळवता, येवढीच त्यांची ओळख करून दिली जाते. पण वाडेकर हे व्यक्तिमत्त्व त्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. 

त्यांनी ३७ कसोटीत २११३ धावा केल्या. २००० धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले भारतीय डावखुरे फलंदाज होते.  तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी १८९९ धावा केल्या. राहुल द्रविड, मोईंदर अमरनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांच्यानंतर या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे तेच. स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनी आपला दबदबा राखला. १७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ४७.०३च्या सरासरीने १५३८० धावा केल्या आणि त्यात ३६ खणखणीत शतकांचाही समावेश आहे. रणजी करंडकातील त्यांनी ५९.२९च्या सरासरीने १२ शतकांसह ४३८८ धावा चोपल्या.  

वाडेकर आक्रमकपेक्षा मोहक होते. फलंदाजीला आल्यावर ज्याप्रकारे ते स्टान्स घ्यायचे ते गोलंदाजांविरुद्ध युद्ध छेडण्यासारखेच असे. त्यांच्याकडून लोकांना अपेक्षित असलेल्या आक्रमकतेपेक्षा ते अधिक ताकदीने चेंडूवर प्रहार करायचे. ही आक्रमकता केवळ बॅट आणि बॉल युध्दापुरतीच असायची. त्याचे प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत वैयक्तिक वादात रूपांतर त्यात कधीच होऊ दिले नाही. म्हणून एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि ती अखेरच्या श्वासापर्यंत कायम राखली. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचे आदर्श जसे आपल्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरले, तसे ते पुढील पिढीसाठीही ठरतील.

Web Title: Ajit Wadekar: Their aggressiveness is only for bat-ball warfare ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.