न्यूझीलंडने मिळवला आत्मविश्वास, टेलर, लॅथम यांचा झंझावात, भारतीय अध्यक्षीय एकादशचा ३३ धावांनी केला पराभव

पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या न्यूझीलंड संघाने दुस-या सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादश संघाचा ३३ धावांनी पराभव करत आपली गाडी विजयी मार्गावर आणली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:32 AM2017-10-20T01:32:22+5:302017-10-20T01:32:39+5:30

whatsapp join usJoin us
 New Zealand beat self-confidence, Taylor, Latham to win series, Indian eves beat India by 33 runs | न्यूझीलंडने मिळवला आत्मविश्वास, टेलर, लॅथम यांचा झंझावात, भारतीय अध्यक्षीय एकादशचा ३३ धावांनी केला पराभव

न्यूझीलंडने मिळवला आत्मविश्वास, टेलर, लॅथम यांचा झंझावात, भारतीय अध्यक्षीय एकादशचा ३३ धावांनी केला पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या न्यूझीलंड संघाने दुस-या सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादश संघाचा ३३ धावांनी पराभव करत आपली गाडी विजयी मार्गावर आणली. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या झंझवाती शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम ५० षटकांत ९ बाद ३४३ धावांचा डोंगर रचला. यानंतर अध्यक्षीय एकादशचा डाव ४७.१ षटकात ३१० धावांत गुंडाळून किवींनी बाजी मारली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. २२ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या भारतविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेआधी सराव सामन्यातील विजय न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा होता. याच निर्धाराने किवी फलंदाजांनी आक्रमक सुरुवातही केली. आघाडीचे फलंदाज फारशी चमक न दाखवता बाद झाल्यानंतर टेलर-लॅथम यांनी १६६ धावांची निर्णायक भागीदारी करून न्यूझीलंडला मजबूत धावसंख्या गाठून दिली.
धावांचा पाठलाग करताना भारतीय अध्यक्षीय एकादशने चांगली फलंदाजी केली. करुण नायर (५३) आणि गुरकीरत मान (६५) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर अखेरपर्यंत अध्यक्षीय एकादश संघाने विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, मोक्याच्या क्षणी प्रमुख फलंदाजांचे बळी गेल्याने आणि तळाच्या फळीतील जयदेव उनाडकट (४४) याला अपेक्षित साथ न मिळाल्याने अध्यक्षीय एकादशला ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरलेला पृथ्वी शॉ याने ३८ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंत (७), कर्णधार श्रेयश अय्यर (२४), मिलिंद (३), शिवम चौधरी (१२) अपयशी ठरल्याने अध्यक्षीय एकादशच्या फलंदाजीला खिंडार पडले. करुण आणि गुरकीरत यांनी झुंजार अर्धशतक झळकावत संघाकडून अपयशी झुंज दिली. करुणने ५४ चेंडूत ७ चौकारांसह, तर गुरकीरतने ४६ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह आक्रमक अर्धशतक झळकावले. हे दोघे बाद झाल्यानंतर उनाडकटने २४ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांचा तडाखा दिला, तसेच धवल कुलकर्णीनेही ३० चेंडूत २ चौकार
व एका षटकारासह २४ धावांची खेळी केली. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात दोघेही अपयशी ठरले. फिरकीपटू मिशेल सँटनर (३/४४) आणि वेगवान गोलंदाज टिम साऊदी (२/२२) यांनी चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)

चांगल्या सुरुवातीनंतर झटपट तीन बळी गेल्याने न्यूझीलंडचा डाव ७.४ षटकात बिनबाद ४६ वरुन १५.३ षटकात ३ बाद ७३ धावा असा घसरला. यावेळी, पुन्हा एकदा किवी संघाला अनपेक्षित निकालास सामोरे जावे लागणार अशी चिन्हे होती. परंतु, टेलर - लॅथम यांनी चौफेर फटकेबाजी करताना संघाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढले. टेलर ८३ चेंडूत १४ चौकार व एका षटकारासह १०२ धावांची वादळी खेळी करून निवृत्त झाला. लॅथमही ९७ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांचा तडाखा देऊन निवृत्त झाला. या दोघांनंतर हेन्री निकोल्स (१७ चेंडूत २४) आणि मिशेल सँटनर (१८ चेंडूत नाबाद २९) यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे न्यूझीलंडने मोठी धावसंख्या रचली. जयदेव उनाडकटने ५७ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : ५० षटकांत ९ बाद ३४३ धावा
(टॉम लॅथम निवृत्त १०८, रॉस टेलर निवृत्त १०२, मिशेल सँटनर नाबाद २९; जयदेव उनाडकट ४/५७, कर्ण शर्मा २/४५) वि.वि. भारतीय अध्यक्षीय एकादश : ४७.१ षटकांत सर्वबाद ३१० धावा (गुरकीरत
मान ६५, करुण नायर ५३, जयदेव उनाडकट ४४; मिशेल सँटनर ३/४४, टीम साऊदी २/२२, कॉलिन मुन्रो २/२५)

Web Title:  New Zealand beat self-confidence, Taylor, Latham to win series, Indian eves beat India by 33 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.