यशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही, न्यूझीलंडमध्ये चाहत्यांना आला अनुभव

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे विमानतळावर दाखल झाले. पण चाहत्यांना मात्र यावेळी दोन भिन्न अनुभव यावेळी आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 07:11 PM2019-01-21T19:11:15+5:302019-01-21T19:13:56+5:30

whatsapp join usJoin us
ms Dhoni is not in the air like virat Kohli , fans in New Zealand got the experience | यशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही, न्यूझीलंडमध्ये चाहत्यांना आला अनुभव

यशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही, न्यूझीलंडमध्ये चाहत्यांना आला अनुभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : तुम्ही एक प्रोफेशनल म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात, हेदेखील महत्वाचे असते. या गोष्टीचा प्रत्यय सध्याच्या घडीला न्यूझीलंडमध्ये क्रिकेट चाहत्यांना आला. भारताच्या संघाचे आज न्यूझीलंडमध्ये आगमन झाले. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे विमानतळावर दाखल झाले. पण चाहत्यांना मात्र यावेळी दोन भिन्न अनुभव यावेळी आले.

विराट आणि अनुष्का जेव्हा आपल्या सामानासह विामानतळाबाहेर आले तेव्हा चाहत्यांनी त्यांना चीअर केले. पण विराट आणि अनुष्का यांनी मात्र चाहत्यांचा हिरमोड केला. चाहत्यांना या दोघांच्या स्वाक्षरा घ्यायच्या होत्या. पण या दोघांनीही चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली नाही.

भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्याला 23 जानेवारीला पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या एकाही खेळाडूची पत्नी नव्हती, पण कोहली आपल्या पत्नीबरोबर आल्यावर चाहत्यांनी एकच कल्ला केला.

चाहत्यांनी यावेळी धोनी आल्यावरही त्याला चीअर केले. त्यावेळी काही चाहत्यांनी धोनीकडे स्वाक्षऱ्यांची मागणी केली. यावेळी धोनी चाहत्यांना सोडून पुढे गेला नाही. चाहत्यांसाठी धोनी थांबला. त्याने चाहत्यांना स्वाक्षऱ्या दिल्या, त्याचबरोबर चाहत्यांना आपल्याबरोबर फोटोही काढायला दिले.

हा पाहा खास व्हिडीओ


 


Web Title: ms Dhoni is not in the air like virat Kohli , fans in New Zealand got the experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.