मोहम्मद शमीवर पत्नी हसीनचे पुन्हा गंभीर आरोप

भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर पत्नी हसीनने पुन्हा आरोप केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:52 PM2018-08-02T12:52:36+5:302018-08-02T12:53:39+5:30

whatsapp join usJoin us
mohammed shami wife haseen once again target him | मोहम्मद शमीवर पत्नी हसीनचे पुन्हा गंभीर आरोप

मोहम्मद शमीवर पत्नी हसीनचे पुन्हा गंभीर आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर पत्नी हसीनने पुन्हा आरोप केले आहेत. या दोघांमधीत वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावेळी हसीनाने शमीवर वय चोरीचा आरोप केला आहे. 

हसीनने तिच्या फेसबुकवर शमीचे पाच वेगवेगळी कागदपत्र पोस्ट केली आहेत. त्यात 10वी, 12वीची मार्कशीट, वाहन परवाना, चेकबुक आणि मतदान ओळखपत्र यांचा समावेश आहे. या कागदपत्राच्या माध्यमातून शमीची वय चोरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न हसीनाने केला आहे. 


शमीची वाहन परवान्यावर जन्म तारीख 8/5/1982 आहे, तर 10व्या मार्कशीटवर 3/1/984 अशी आहे. याशिवाय मतदान ओळखपत्रानुसार 1/1/2001 मध्येच शमी 21 वर्षांचा झाल्याचे सिद्ध होत आहे. 12 वीच्या मार्कशीटवर शमीची जन्मतारीख 3/9/1990 अशी आहे. या फोटोवर हसीनने पोस्ट केली आहे, ज्यात तीने शमीला 420 असे संबोधले आहे.  

Web Title: mohammed shami wife haseen once again target him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.