IPL 2019 RCB vs DC : मुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकार

IPL 2019 RCB vs DC : श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बारा वाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 07:21 PM2019-04-07T19:21:02+5:302019-04-07T19:26:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 RCB vs DC : Royal Challengers Bangalore lost sixth match in row, Delhi Capitals won by 4 wickets | IPL 2019 RCB vs DC : मुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकार

IPL 2019 RCB vs DC : मुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, आयपीएल 2019 : श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बारा वाजवले. या जोडीने दमदार फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेट राखून विजय मिळवून दिला. बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव ठरल्याने प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. 149 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने 28, तर अय्यरने 67 धावांची खेळी केली. दिल्लीने हे लक्ष्य 18.5 षटकांत पूर्ण केले.



 

रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीनेही 41 धावा करण्यासाठी 33 चेंडूंचा सामना केला. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.  



लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का बसला. टीम साउदीने दुसऱ्याच चेंडूवर शिखर धवनला बाद केले. अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यरचा झेल यष्टिरक्षक पार्थिव पटेलने सोडला. बंगळुरूला पहिल्याच षटकात यश मिळवून देणाऱ्या साउदीला मात्र तिसऱ्या षटकात पृथ्वी शॉने बदडवले. साउदीला त्याने सलग पाच चेंडूंत चौकार ठोकले. पाचवा चौकार हा पंचांनी लेग बाय दिला. पृथ्वी आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला आणि त्यामुळे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. पवन नेगीने बंगळुरूला यश मिळवून दिले. त्याने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीन 22 चेंडूंत 28 धावा केल्या. श्रेयस अय्यरला जीवदान. पवन नेगीने टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरचा झेल पार्थिव पटेलने सोडला.

य्यरने कॉलीन इंग्रामसह दिल्लीची लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरूच ठेवली. या दोघांनी बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 14व्या षटकात दिल्लीला आणखी एक धक्का बसला. इंग्राम 22 धावांवर मोइन अलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अय्यरने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधली त्याचे 11 वे अर्धशतक ठरले. अय्यरने 50 चेंडूंत 67 धावा केल्या. त्यात 8 चौकार व 2 षटकारांचा समावेश आहे. 


 

Web Title: IPL 2019 RCB vs DC : Royal Challengers Bangalore lost sixth match in row, Delhi Capitals won by 4 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.