IPL 2018: VIDEO- सामना जिंकल्यानंतर धोनीसाठी ब्राव्होचा धमाल डान्स

सामना संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 10:33 AM2018-05-23T10:33:40+5:302018-05-23T10:33:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: dwayne bravo pays tribute to ms dhoni in dressing room | IPL 2018: VIDEO- सामना जिंकल्यानंतर धोनीसाठी ब्राव्होचा धमाल डान्स

IPL 2018: VIDEO- सामना जिंकल्यानंतर धोनीसाठी ब्राव्होचा धमाल डान्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई- फॅफ ड्यू प्लेसिसच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. क्लालिफायरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नईपुढे 140 धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत होते. पण फॅफने मात्र हार मानली नाही. अखेरच्या षटकापर्यंत तो लढला आणि संघाला विजयाचे तोरण बांधून दिलं. अखेरच्या षटकात दमदार षटकार ठोकत फॅफनेच चेन्नईला दोन विकेट्स राखून विजय मिळवून दिला.  फॅफने 42 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 67 धावांची दमदार खेळी साकारली.

सामना संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो नाचताना व गाताना पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्राम हॅण्डवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ब्राव्हो आणि हरभजन सिंह नाचताना दिसत आहेत. ब्राव्होचा स्पेशल डान्स एम.एस धोनीसाठी होता. विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी ब्राव्होने धोनीसाठी डान्स केला. ब्राव्होच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Web Title: IPL 2018: dwayne bravo pays tribute to ms dhoni in dressing room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.