ipl-2018-10th-match-kolkata-knight-riders-kkr-vs-sunrisers- hyderabad-srh-live-score-update | IPL 2018 KKR VS SRH : हैदराबादचा कोलकात्यावर पाच गडी राखून विजय
IPL 2018 KKR VS SRH : हैदराबादचा कोलकात्यावर पाच गडी राखून विजय

कोलकाताः आयपीएल-11 मधील दोनपैकी दोनही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. कोलकाता नाइट रायडर्यने दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने शानदार खेळी करत पाच गड्यांच्या मोबदल्यात 19 षटकात 139 धावा केल्या. 

मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात सावध गतीने झाली. मात्र, वृद्धिमान साहा बाद झाल्यानंतर विलियमसन आणि शाकिबने शानदार खेळी करत सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या वाढविली. त्यांच्या खेळीसमोर कोलकाता नाइट रायडर्सचे गोलंदाज अपयशी ठरले. 

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने दोनपैकी एक सामना जिंकला असून सनरायझर्स हैदराबादशी लढताना त्यांचा चांगलाच कस लागला.

KKR vs. SRH Updates:

00:26 :  हैदराबादचा कोलकात्यावर पाच गडी राखून विजय 

00:23 : यूसुफ पठाणचा शानदार चौका, हैदराबादला जिंकण्यासाठी आठ चेंडूत सात धावांची गरज.

00:15 : विलियमसन बाद, हैदराबादला पाचवा झटका, धावसंख्या - 124/4

00:12 : हैदराबादच्या 17 षटकात चार बाद 118 धावा.  

00:05 : हैदराबादला चौथा धक्का, गोलंदाज पियुष चावलाने घेतली विकेट,  शाकिब अल हसन  बाद, 

00:01 : विलियमसनची शानदार खेळी, एस.मावीच्या गोलंदाजीवर षटकार

23:55 : हैदराबादची धावसंख्या - 13 षटकात तीन बाद 93 धावा.

23:47 : रसेलच्या गोलंदाजीवर शाकिबचा शानदार चौकार.

23:46 : हैदराबादला जिंकण्यासाठी 25 चेंडूत 65 धावांची गरज. 

23:38 : हैदराबादची नऊ षटकात तीन बाद 58 धावा, विलियमसन आणि शाकिब मैदानात खेळत आहेत.

23:33 : हैदराबादला तिसरा धक्का, मनिष पांडे अवघ्या 4 धावांवर तंबूत परतला,  के.यादवने घेतली मनिष पांडेची विकेट.

23:25 : हैदराबादची सावध खेळी, सात षटकात दोन बाद 49 धावा.

23:18 : शिखर धवन ७ धावांवर बाद, हैदराबादची धावसंख्या - 46/2

23:12 : हैदराबादला पहिला झटका...वृद्धिमान साहा बाद.

23:07 : वृद्धिमान साहाचा चौकार... वृद्धिमानकडून शानदार खेळीला सुरुवात...

 22.55 : हैदराबादचे सलामीवीर मैदानात... सनरायझर्सच्या चाहत्यांना शिखर धवनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा...

22.39 : कोलकात्याचं हैदराबादला विजयासाठी १३९ धावांचं आव्हान... २० षटकांत ८ विकेट गमावून केल्या १३८ धावा...

22.30 : दिनेश कार्तिक २९ धावा करून माघारी...  कोलकात्याची धावगती वाढेना...

22.23 : शुभमन गिल बाद... कोलकात्याला सहावा धक्का... १७ ओव्हरनंतर केकेआर ६ बाद ११३ धावा...

22.11 : कोलकात्याच्या १०० धावा पूर्ण... दिनेश कार्तिकचे 'आस्ते कदम'...

22.03 : कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत... आंद्रे रसेल ९ धावांवर बाद...

21.59 : ख्रिस लिनचं अर्धशतक एका धावेनं हुकलं... शाकिब अल हसनचा भन्नाट झेल... कोलकाता ४ बाद ८७ धावा...

21.52 : कोलकात्याचे त्रिकूट तंबूत... सुनील नरेन स्वस्तात बाद... कर्णधार दिनेश कार्तिककडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा...

21.46 : दहा षटकांत कोलकात्याच्या २ बाद ७० धावा...

21.33 : कोलकात्याला दुसरा धक्का... नितीश राणा १८ धावांवर बाद...

21.30 : एका तासाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरू...

20.40 : ख्रिस लिन ३१ धावांवर, तर नितीश राणा १८ धावांवर... पाऊस थांबण्याची चाहत्यांना प्रतीक्षा...

20.33 : सामन्यात पावसाचा व्यत्यय... अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं खेळ थांबवला...

20.31 :शाकिब अल हसनचा टिच्चून मारा... सातव्या षटकांत फक्त तीन धावा...

20.29 : सहाव्या षटकांनंतर कोलकाता १ बाद ४९ धावा...

20.12 : कोलकात्याला पहिला धक्का, रॉबिन उथप्पा ३ धावांवर बाद...

20.07 : दोन षटकांत कोलकात्याच्या बिनबाद १० धावा...

20.00 : सनरायझर्स हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय... कोलकाता नाइट रायडर्सचा लागणार कस...  Web Title: ipl-2018-10th-match-kolkata-knight-riders-kkr-vs-sunrisers- hyderabad-srh-live-score-update
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.