India Vs New Zealand World Cup Semi Final :कोहली झाला तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत फेल

कोहलीने उपांत्य फेरीसाठी शतक राखून ठेवले आहे, असे त्याचे चाहते म्हणत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 06:02 PM2019-07-10T18:02:13+5:302019-07-10T18:04:14+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand World Cup Semi Final: Virat Kohli fails to score more in third semifinal | India Vs New Zealand World Cup Semi Final :कोहली झाला तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत फेल

India Vs New Zealand World Cup Semi Final :कोहली झाला तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत फेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला फक्त एक धावच करता आली. आतापर्यंत विश्वचषकात कोहलीने सलग पाच अर्धशतके झळकावत विक्रम केला होता. कोहलीने उपांत्य फेरीसाठी शतक राखून ठेवले आहे, असे त्याचे चाहते म्हणत होते.

कोहली पहिल्यांदा विश्वचषकात खेळला तो २०११ साली. या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीतील सामना पाकिस्तानबरोबर मोहाली येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात ९ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर २०१५ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडली होती. त्यावेळी कोहलीला फक्त एकच धाव करता आली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही कोहलीला फक्त एक धाव करता आली. कोहली आतापर्यंत तीन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला असून त्याला एकूण ११ धावाच करता आल्या आहेत.

न्यूझीलंडचे बॅडलक, नाही तर पंड्या आणि पंत होते आऊट
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताला सळो की पळो करून सोडले होते. पण त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी भारताचा डाव सावरला. पण न्यूझीलंडचे यावेळी दुर्देव पाहायला मिळाले. कारण हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतही आऊट झाले असते, पण...

भारताची दहाव्या षटकात ४ बाद २४ अशी दयनीय अवस्था न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केली होती. पण यानंतर पंत लुकी फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर आऊट झाला असता, पण यावेळी त्याचा झेल जिमी निशामने सोडला. त्यानंतर फर्ग्युसनच्याच गोलंदाजीवर पंड्या मोठा फटका मारायला गेला. पण मार्टीन गप्तील त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. जर गप्तील चेंडूपर्यंत पोहोचला असता तर पंड्याला तंबूत परतावे लागले असते.

कार्तिक आऊट झाला आणि जाँटी ऱ्होड्सची आठवण आली...
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला चौथा धक्का बसला तो दिनेश कार्तिकच्या रुपात. पण कार्तिक जेव्हा आऊट झाला तेव्हा मात्र क्रिकेट जगताला आठवला तो दक्षिण आफ्रिकेचा जाँटी ऱ्होड्स. या सामन्यात ऱ्होड्सला आठवण्यासारखं नेमकं झालं तरी काय, हा विचार आता तुम्ही करत असाल.

या सामन्याच्या दहाव्या षटकात ही गोष्ट घडली. हे षटक मॅट हेनरी टाकत होती. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कार्तिक मोठा फटका मारायला गेला आणि आऊट झाला. यावेळी त्याचा अप्रतिम झेल जिमी निशामने पकडला. पण झेल त्याने सूर लगावत एका हातात पकडला आणि साऱ्यांनाच ऱ्होड्सची आठवण आल्यावाचून राहीली नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. 

बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या. 

Web Title: India vs New Zealand World Cup Semi Final: Virat Kohli fails to score more in third semifinal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.