India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ

India vs New Zealand ODI : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिल्या वन डेत दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 11:44 AM2019-01-24T11:44:24+5:302019-01-24T11:45:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand ODI : Rohit Sharma left amused by Trent Boult's insane footwork, Watch video | India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ

India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला नमवले2009नंतर न्यूझीलंडमध्ये पहिलाच वन डे सामना विजय

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिल्या वन डेत दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने आठ विकेट राखून सामना जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला बाद करण्यासाठी फिरकीपटू कुलदीप यादवला दिलेल्या सल्ल्याची चर्चा अधिक रंगली. याच सामन्यात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बोल्टचे पदलालित्य पाहून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माला हसू आवरले नाही. 

सामन्याच्या 37व्या षटकात हा प्रसंग घडला. चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासाठी पुढे आला, परंतु चेंडूचा अंदाज बांधता न आल्याने तो चाचपडत मागे परतला. बोल्टचे हे कृत्य पाहून स्लिपमध्ये उभा असलेला रोहित हसू लागला.  
पाहा व्हिडीओ...



विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ 157 धावांवर माघारी परतला. भारताने हे लक्ष्य 15.1 षटकं आणि आठ विकेट राखून पूर्ण केले. भारताने 2009 नंतर न्यूझीलंडमध्ये प्रथमच वन डे सामना जिंकला आहे. 

Web Title: India vs New Zealand ODI : Rohit Sharma left amused by Trent Boult's insane footwork, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.