India vs New Zealand 2nd T20 : ... अन् रोहितच्या मदतीला धोनी धावून आला

धोनी फक्त एकच वाक्य बोलला आणि सारा पेच सुटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:26 PM2019-02-08T12:26:48+5:302019-02-08T12:27:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 2nd T20: ... and ms Dhoni help Rohit sharma | India vs New Zealand 2nd T20 : ... अन् रोहितच्या मदतीला धोनी धावून आला

India vs New Zealand 2nd T20 : ... अन् रोहितच्या मदतीला धोनी धावून आला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा अनुभव सर्वश्रूत असाच. कर्णधार कुणीही असो विराट कोहली किंवा रोहित शर्मा धोनी हा पडद्यामागचा कर्णधार आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. या गोष्टीचा प्रत्यय न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातही पाहायला मिळाला.

दुसऱ्या सामन्यात कृणाल पंड्याने डॅरिल मिचेलला पायचीत पकडले. यावेळी मैदानावरील पंचांनी मिचेलला बाद दिले. भारतीय संघाने जल्लोष केला. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पंचांकडे रीव्ह्यू मागितला. कारण हा चेंडू बॅटला लागल्याचे मिचेलने केनला सांगितले होते. तिसऱ्या पंचाकडे विचारणा करण्यात आली आणि त्यांनी या गोष्टीचा रीव्ह्यू करायला सुरुवात केली.


तिसऱ्या पंचांनी चेंडू नेमका कुठे पडला, पॅडवर कुठे लागला आणि तो स्टम्पवर जातोय का, हे पाहिले. त्यानंतर तिसऱ्या पंचांनीही मिचेलला बाद ठरवले. त्यावेळी केन मैदानावरील पंचांना सांगत होता की, हा चेंडू मिचेलच्या बॅटला लागला आहे. त्यामुळे तो बाद ठरत नाही, असे सांगितले. हॉटस्पॉटमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसतही होते. त्यावेळी केन पंचांची वाद घालत होता. पंच ऐकत नाहीत, हे पाहिल्यावर त्याने आपला मोर्चा रोहितकडे वळवला आणि मिचेल बाद नसल्याचे सांगितले. त्यावेळी रोहितला नेमके काय करावे ते कळत नव्हते. मिचेलला बाद ठरवायचे कि खेळायला द्यायचे, हा विचार रोहित करत होता. मिचेल नाबाद आहे, त्याला खेळायला द्या, असे केन रोहितला सांगत होता. रोहितला काय करावे हे कळत नसताना, धोनी त्याच्यासाठी धावून आला. धोनी फक्त एकच वाक्य बोलला आणि सारा पेच सुटला. धोनी म्हणाला, " पंचांना निर्णय आम्हाला मान्य असेल." पंचांनी मिचेलला बाद ठरवले होते. त्यामुळे त्याला परतण्यावाचून पर्याय उरला नव्हता.

Web Title: India vs New Zealand 2nd T20: ... and ms Dhoni help Rohit sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.