India VS England One Day : दादा आणि कॅप्टन कुलपेक्षा विराट ठरला सरस, केला हा विक्रम !

भारताने नॉटिंगहॅम वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवताना इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाने विराटच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:28 PM2018-07-13T18:28:07+5:302018-07-13T18:28:45+5:30

whatsapp join usJoin us
India VS England One Day: Kohli level with two highly successful ODI captains | India VS England One Day : दादा आणि कॅप्टन कुलपेक्षा विराट ठरला सरस, केला हा विक्रम !

India VS England One Day : दादा आणि कॅप्टन कुलपेक्षा विराट ठरला सरस, केला हा विक्रम !

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नॉटिंगहॅम - भारताने नॉटिंगहॅम वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवताना इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कुलदीप यादवने टिपलेले सहा बळी आणि त्यानंतर रोहित शर्माने साकारलेली शतकी खेळी यांच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनेही 75 धावांचे बहुमुल्य योगदान दिले. भारताच्या या विजयाने विराटच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने क्लाईव्ह लॉयड आणि रिकी पाँटिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली करताना सौरव गांगुली ( दादा ) आणि महेंद्रसिंग धोनी ( कॅप्टन कुल) यांनाही मागे टाकले. 
भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव २६८ धावांत संपुष्टात आणला. यानंतर भारताने ४०.१ षटकातंच केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात २६९ धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना रोहित - शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी देत चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर विराट आणि रोहित यांनी भारताला विजय मिळवून दिला. रोहितने नाबाद 137 धावा केल्या. विराटने 82 चेंडूंत 75 धावांची खेळी साकारली. तत्पूर्वी कुलदीपने 10 षटकांत 25 धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. या विजयाने विराटच्या खात्यात आणखी एक विक्रम नोंदवला. त्याने लॉयड आणि पाँटिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून पन्नास सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमात विराटने संयुक्तपणे अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. 

 
लॉयड आणि पाँटिंग यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्या पन्नास सामन्यांत सर्वाधिक 39 विजय मिळवण्याच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. याशिवाय त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हँसी क्रोनिए (37), वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर व्हिव्हियन रिचर्ड्स (36) , दक्षिण आफ्रिकेचा शॉन पॉलॉक ( 34) आणि पाकिस्तानचा वासीम अक्रम (33) यांना पिछाडीवर टाकले आहे. 
 

Web Title: India VS England One Day: Kohli level with two highly successful ODI captains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.