India vs England 4th Test: पुजाराच्या हेल्मेटवर बाऊंसर आदळला, त्यानंतर स्टोक्सने केलं असं काही

India vs England 4th Test: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतीत चौथ्या लढतीत चेतेश्वर पुजाराने दमदार शतकी खेळी करून भारताचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 11:32 AM2018-09-01T11:32:22+5:302018-09-01T11:37:52+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test: A bouncer hit on Cheteshwar Pujara's helmet | India vs England 4th Test: पुजाराच्या हेल्मेटवर बाऊंसर आदळला, त्यानंतर स्टोक्सने केलं असं काही

India vs England 4th Test: पुजाराच्या हेल्मेटवर बाऊंसर आदळला, त्यानंतर स्टोक्सने केलं असं काही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साऊदम्टन, भारत विरुद्ध इंग्लंड: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतीत चौथ्या लढतीत चेतेश्वर पुजाराने दमदार शतकी खेळी करून भारताचा डाव सावरला. पुजाराने 257 चेंडूंचा सामना करताना नाबाद 132 धावांची खेळी केली आणि त्या जोरावर भारतीय संघ पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध 27 धावांची आघाडी घेऊ शकला. भारताचा पहिला डाव 273 धावांत आटोपला. 

नॉटिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या डावात पुजाराने अर्धशतकी खेळी केली होती आणि पुन्हा एकदा संघ संकटात असताना पुजाराने खेळपट्टीवर नांगर रोवला. पण, शतकी खेळी साकारणारा पुजारा दुखापतग्रस्त होता होता थोडक्यात बचावला. सामन्याच्या 51व्या षटकात बेन स्टोक्सच्या बाऊंसरवर फटका मारण्याचा पुजाराने प्रयत्न केला. त्याने वेगाने बॅट फिरवली, परंतु चेंडूचा वेग पकडण्यात तो अपयशी ठरला आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर पुजाराने त्वरित हेल्मेट काढले आणि ते तपासू लागला. स्टोक्सनेही पुजाराकडे धाव घेत त्याची विचारपूस केली.



पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 15 वे शतक पूर्ण केले. त्यापैकी पाच शतकं ही इंग्लंडविरुद्धची आहेत. कसोटीतील सर्वोत्तम खेळीही पुजाराने इंग्लंडविरुद्धच केली आहे आणि त्याने 2012च्या कसोटीत नाबाद 206 धावा केल्या होत्या. साऊदम्टन कसोटीत त्याने शतक झळकावून भारताला आघाडी मिळवून दिली. पाहा हा व्हिडीओ...

Web Title: India vs England 4th Test: A bouncer hit on Cheteshwar Pujara's helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.