India vs England 3rd Test: आर. अश्विनवर जेव्हा रवी शास्त्री भडकले... व्हिडीओ झाला वायरल

भारतीय संघ गोलंदाजीला उतरला. पण भारताचा फिरकीपटू मात्र मैदानात उतरला नाही, त्याच्यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच भडकले. त्यांचा हा व्हिडीओ वायरल झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:57 PM2018-08-20T13:57:10+5:302018-08-20T13:57:21+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test: When Ravi Shastri was angry on Ashwin ... Video became viral | India vs England 3rd Test: आर. अश्विनवर जेव्हा रवी शास्त्री भडकले... व्हिडीओ झाला वायरल

India vs England 3rd Test: आर. अश्विनवर जेव्हा रवी शास्त्री भडकले... व्हिडीओ झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजेव्हा अश्विन पेव्हेलियनमध्ये आला तेव्हा शास्त्री यांचा पारा चांगलाच चढलेला होता.

नॉटिंगहम : सामना सुरु असताना तुम्ही जर मैदान सोडून बाहेर जात असाल, तर कोणता प्रशिक्षक ते खपवून घेईल. असंच काहीसं घडलं ते भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी. भारतीय संघाचा पहिला डाव ३२९ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीला उतरला. पण भारताचा फिरकीपटू मात्र मैदानात उतरला नाही, त्याच्यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच भडकले. त्यांचा हा व्हिडीओ वायरल झाला आहे. 

शास्त्री अश्विनवर भडकले तो व्हिडीओ पाहा


दुसऱ्या दिवशीचा लंच झाला, पण त्यानंतर मात्र अश्विन मैदानात दिसला नाही. अश्विनच्या जागी मुंबईच्या शार्दुल ठाकूरला बदली खेळाडू म्हणून मैदानात पाठवले गेले. आपल्या कंबरेला दुखापत झाली आहे, असे अश्विनने त्यावेळी सांगिलते. पण त्यानंतर अश्विन मैदानातील इंडोर अकादमीमध्ये गोलंदाजीचा सराव करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जेव्हा अश्विन पेव्हेलियनमध्ये आला तेव्हा शास्त्री यांचा पारा चांगलाच चढलेला होता. अश्विनने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला शास्त्री यांच्या रागापुढे काहीच करता आले नाही. त्यावेळी अश्विन पेव्हेलियनमधून उठला आणि बाहेर गेला.

अश्विन सराव करत असलेला व्हिडीओ पाहा


Web Title: India vs England 3rd Test: When Ravi Shastri was angry on Ashwin ... Video became viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.