India vs Australia : कॅप्टन कोहलीचे पुनरागमन, ऑसीविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय  संघाची घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:00 PM2019-02-15T17:00:14+5:302019-02-15T17:24:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: Captain Virat Kohli returns in India squad, BCCI Announces team for Australia series | India vs Australia : कॅप्टन कोहलीचे पुनरागमन, ऑसीविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

India vs Australia : कॅप्टन कोहलीचे पुनरागमन, ऑसीविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय  संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले आहे.  भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) पहिल्या दोन वन डे आणि उर्वरित वन डे सामन्यांसाठी वेगळे संघ जाहीर केले आहेत. ट्वेंटी- 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दिनेश कार्तिकला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे.

कोहलीचा ट्वेंटी-20 व वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासह जसप्रीत बुमराचाही 15 सदस्यीय संघांत समावेश करण्यात आला आहे. बुमरालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.  

ट्वेंटी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती...
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी निवडलेल्या संघात फिरकीपटू कुलदीप यादवला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याचे संघात स्थान कायम आहे, तर बुमरा कमबॅक करणार आहे. लोकेश राहुलही या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक करणार आहे. कॉफी विथ करण कार्यक्रमातील वादानंतर राहुल भारतीय संघाकडून खेळलेला नाही. उमेश यादवला संघात स्थान मिळाले असून भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. 
ट्वेंटी -20 संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग दोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.. 
 



 
बुमरा-शमीच्या जोडीला सिद्धार्थ कौल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी संघात तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौलला संधी मिळाली आहे.
संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल.  

भुवनेश्वर कुमारची वापसी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि पहिल्या दोन वन डे सामन्यात स्थान न मिळालेल्या भुवनेश्वर कुमारला उर्वरित तीन वन डे सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, , युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल


Web Title: India vs Australia: Captain Virat Kohli returns in India squad, BCCI Announces team for Australia series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.