IND vs WI T20: रोहितच्या नावावर होऊ शकतात 'विराट' विक्रम

रोहित सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते. या शतकासह रोहितने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 01:58 PM2018-11-10T13:58:59+5:302018-11-10T14:00:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI T20: Rohit sharma's name can be big record | IND vs WI T20: रोहितच्या नावावर होऊ शकतात 'विराट' विक्रम

IND vs WI T20: रोहितच्या नावावर होऊ शकतात 'विराट' विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया सामन्यात त्याने जर पुन्हा सात षटकार लगावले तर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये या वर्षी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. या सामन्यात त्याने 69 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल.रोहितच्या नावावर सध्या 2203 धावा आहेत.

चेन्नई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आता विराट विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रोहितला दोन विक्रम खुणावत आहेत. रोहितने जर आपला फॉर्मा कायम राखला तर त्याला या सामन्यात हा विक्रम रचता येऊ शकतो.

रोहित सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते. या शतकासह रोहितने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला होता.

गेल्या सामन्यात शतक लगावताना रोहितने सात षटकार लगावले होते. या सामन्यात त्याने जर पुन्हा सात षटकार लगावले तर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये या वर्षी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. या वर्षात सर्वाधिक षटकार न्यूझीलंडच्या कॉलिन मुर्नोच्या (35) नावावर आहेत. रोहितच्या नावावर सध्या 29 षटकार आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याने सात षटकार लगावले तर त्याच्या नावावर हा विक्रम होऊ शकतो.

रोहितला अजून एक विक्रम खुणावत आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावून त्याने भारताकडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रचला होता. पण या सामन्यात त्याने 69 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. रोहितच्या नावावर सध्या 2203 धावा आहेत. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर 2271 धावा आहेत. त्यामुळे रोहितॉने 69 धावा केल्यास त्याच्या नावावर हा विक्रमही होऊ शकतो.

Web Title: IND vs WI T20: Rohit sharma's name can be big record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.