IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट

भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 05:33 PM2018-12-03T17:33:30+5:302018-12-03T17:35:17+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: Indian players made photoshoot before the first Test | IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट

IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा, अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि लोकेश राहुल यांचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सहा डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे. पण त्याचबरोबर पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी फोटोशूट केल्याचे पाहायला मिळाले आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर काही खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत.

भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा, अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि लोकेश राहुल यांचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता.



 

अॅडलेड कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना पर्थ येथे 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न व सिडनी येथे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होतील. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही. 

Web Title: IND vs AUS: Indian players made photoshoot before the first Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.