IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या

कोहलीचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:49 PM2018-12-08T12:49:13+5:302018-12-08T12:53:51+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 1st Test: Australia's coach justin langer smashes virat kohli | IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या

IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकोहली हा सुपरस्टार आहे.मैदानामध्ये कोहली जे सेलिब्रेशन करतो, ते पाहून चांगले वाटले. पण जर हीच गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ही गोष्ट केली असती तर त्यांच्यावर टीका झाली असती.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक आहे. पण त्याचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत. 

लँगर म्हणाले की, " मैदानामध्ये कोहली जे सेलिब्रेशन करतो, ते पाहून चांगले वाटले. पण जर हीच गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ही गोष्ट केली असती तर त्यांच्यावर टीका झाली असती. कोहली हा सुपरस्टार आहे. त्याचबरोबर तो भारताचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर दडपण बनवत असतो. त्यामुळे कदाचित कोहलीकडून असे होत असावे. कोहलीचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही."


 ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर कसा अन्याय होतो, याबाबत लँगर यांनी सांगितले की, " जर कोहली एखादी गोष्ट मैदानात करतो तर त्याच्यावर कोणी टीका करत नाही. पण जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तशीच गोष्ट केली तर ते टीकेचे धनी ठरतात. ही समानता आहे का? माझ्यामते मैदानावर सर्व खेळाडूंना समान न्याय मिळाला पाहिजे." 

Web Title: IND vs AUS 1st Test: Australia's coach justin langer smashes virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.