ICC World Cup 2019 : लोकेश राहुलची मुलाखत सुरु असतानाच घुसला कोहली आणि सुरु झाला वाद

राहुल रोहितच्या फलंदाजीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना कोहली तिथे दाखल झाला आणि या मुलाखतीमधये व्यत्यय आणला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 09:36 PM2019-07-04T21:36:19+5:302019-07-04T21:37:32+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: While Lokesh Rahul's interview is going on, Virat Kohli has started debate | ICC World Cup 2019 : लोकेश राहुलची मुलाखत सुरु असतानाच घुसला कोहली आणि सुरु झाला वाद

ICC World Cup 2019 : लोकेश राहुलची मुलाखत सुरु असतानाच घुसला कोहली आणि सुरु झाला वाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहली आणि वाद यांचं नातं आहे. कोहलीचे बऱ्याच सामन्यात वाद पाहायला मिळाले आहेत. आता तर लोकेश राहुलची मुलाखत सुरु असतानाच घुसला आणि पुन्हा एकदा वाद सुरु झाला.

Image result for KOHLI IN ODI

ही गोष्ट घडली बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातनंतर. या सामन्याच राहुल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी रचली होती. त्याबद्दल राहुलला प्रश्न विचारला गेला. यावर राहुल म्हणाला की, " बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी केली. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी सुरुवातीला पोषक नव्हती. पण तरीही रोहित दमदार फलंदाजी करत होता. रोहितची फलंदाजी पाहायला मजा येत होती."

Related image

राहुल रोहितच्या फलंदाजीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना कोहली तिथे दाखल झाला आणि या मुलाखतीमधये व्यत्यय आणला. त्यानंतर कोहली आणि युजवेंद्र चहल यांच्यामध्ये वाद रंगला. कोहली, मुलाखतीमध्ये घुसत आहे, असे चहल यावेळी म्हणाला. त्यानंतर कोहली आणि चहल यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगला. ही मुलाखत 'चहल टीव्ही'वर सुरु होती. त्यामुळे कोहली आणि चहल यांच्यामध्ये मजेशीर वाद रंगला. पण कोहली या मुलाखतमध्ये का घुसला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढील व्हिडीओमध्ये समजू शकेल.

World Cup: Virat Kohli crashes KL Rahul

हा पाहा व्हिडीओ


.. तर भारत ठरू शकतो उपांत्य फेरीत आऊट, हा आहे धोका

 भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारताचा फॉर्म पाहता ते विश्वविजेते ठरतील, असं बऱ्या जणांना वाटत आहे. पण भारतीय संघात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळेच भारत उपांत्य फेरीत आऊट होऊ शकतो, एका विश्वविजेत्या कर्णधारांनी सांगितले आहे.

भारताचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होईल, असे म्हटले जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामन्यात पाऊस पडला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होती. दुसरीकडे भारताला इंग्लंडने पराभूत केले होते. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारत विजयी ठरणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Image result for kohli upset

वेस्ट इंडिजचे माजी विश्वविजेते कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांनी सांगितले की, " भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. पण भारताचे आता कच्चे दुवेही समोर आले आहेत. भारतीय संघाच्या जास्त धावा पहिल्या तीन फलंदाजांनी केल्या आहेत, ही एका प्रकारे चांगली गोष्ट म्हटली जात आहे, पण हा धोकाही आहे."

Image result for kohli upset

लॉइड पुढे म्हणाले की, " आतापर्यंत भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर तळाच्या फलंदाजांनाही उपयुक्त फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे भारताचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले तर ते अडचणीत येऊ शकतात आणि हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरू शकते."

Web Title: ICC World Cup 2019: While Lokesh Rahul's interview is going on, Virat Kohli has started debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.