ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात महत्त्वाचे बदल; जोफ्रा आर्चरची लॉटरी!

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाचा सुफडा साफ केल्यानंतर इंग्लंडच्या संघाने मंगळवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे त्यांचे 15 शिलेदार जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 02:12 PM2019-05-21T14:12:14+5:302019-05-21T14:23:57+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : England name Liam Dawson and Jofra Archer in final World Cup squad | ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात महत्त्वाचे बदल; जोफ्रा आर्चरची लॉटरी!

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात महत्त्वाचे बदल; जोफ्रा आर्चरची लॉटरी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाचा सुफडा साफ केल्यानंतर इंग्लंडच्या संघाने मंगळवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे त्यांचे 15 शिलेदार जाहीर केले. इंग्लंडने पाच सामन्यांची वन डे मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडने चारही वन डे सामन्यांत 340 हून अधिक धावा केल्या. सलग चार वन डे सामन्यांत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला. विशेष म्हणजे इंग्लंडने हे चारही सामने अगदी सहज जिंकले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडच्या खेळाडूंची कामगिरी सरस झाली आहे. इंग्लंडने वर्ल्ड कप साठी त्यांचे अंतिम 15 शिलेदार आज जाहीर केले. त्यांच्या संघात जोफ्रा आर्चर आणि लिएम डॉसन यांना संधी देण्यात आले आहे.



हॅम्पशायर क्लबचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या डॉसनला पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत स्थान देण्यात आले नव्हते, परंतु त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत वर्ल्ड कप चमूत स्थान पटकावले. जो डॅन्लीच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. आदील रशीद आणि मोईन अली यांना राखीव फिरकीपटू म्हणून डॉसन जबाबदारी पार पाडेल. 


जोफ्रा आर्चर हा या संघातील आश्चर्याची निवड ठरली. संभाव्य संघातही त्याला स्थान देण्यात आले नव्हते, परंतु त्याने पाकिस्तानविरुद्धच्या तीन वन डे सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली.  डेव्हीड विलीच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. जेम्स व्हिन्सीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. 

इंग्लंडचा संघ : इयॉन मॉर्गन ( कर्णधार),  मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, टॉम कुरण, लिएम डॉसन, लिएम प्लंकेट, आदील रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स व्हिंस, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

आता जरा आकड्यांवर नजर टाकूया... 
1 जानेवारी 2018 पासून ते 20 मे 2019 पर्यंतच्या संघांच्या कामगिरीची तुलना केल्यास इंग्लंडचे पारडे जड आहे. इंग्लंडने सलग 11 वने डे मालिकांमध्ये एकही पराभव पत्करलेला नाही आणि घरच्या मैदानावर त्यांचा हा सलग 8 वन डे  मालिका विजय आहे.  
1 जानेवारी 2018 पासून ते आतापर्यंत इंग्लंडने सर्वाधिक 14 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तान ( 8) आणि वेस्ट इंडिज ( 7) यांचा क्रमांक येतो.  या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ( प्रत्येकी 6) चौथ्या स्थानी आहेत. 
याच कालावधीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांमध्येही इंग्लंडने आघाडी घेतली आहे. त्यांनी 24 वन डे सामने जिंकून भारताचा 22 विजयाचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिका/ बांगलादेश 17, न्यूझीलंड /अफगाणिस्तान 15, वेस्ट इंडिज 12, ऑस्ट्रेलिया/ आयर्लंड 11, पाकिस्तान 10 हेही बरेच पिछाडीवर आहेत.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी आतापर्यंत 7 शतकी भागीदारी केल्या. या विक्रमातही भारत ( 4), वेस्ट इंडिज ( 1), अफगाणिस्तान (1) पिछाडीवर आहेत.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील चार सामन्यांत एकूण 2780 धावा झाल्या. 
इंग्लंडला अद्याप एकदाही वर्ल्ड कप उंचावता आलेला नाही. त्यांना तीनवेळा ( 1979, 1987, 1992) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 

 

Web Title: ICC World Cup 2019 : England name Liam Dawson and Jofra Archer in final World Cup squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.