मी आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये नक्की खेळणार- अजिंक्य रहाणे

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 01:35 AM2019-03-10T01:35:21+5:302019-03-10T06:56:39+5:30

whatsapp join usJoin us
I will definitely play in the forthcoming World Cup - Ajinkya Rahane | मी आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये नक्की खेळणार- अजिंक्य रहाणे

मी आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये नक्की खेळणार- अजिंक्य रहाणे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पणजी : सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोघेही संघात असताना अजिंक्य रहाणे कधीही ‘पोस्टर बॉय’ बनू शकला नाही. मात्र, टीम इंडियाला ज्या फलंदाजांनी पुढे नेले, त्यात अजिंक्यच्या नावाचा उल्लेख जरूर होईल. जसे सचिनच्या काळात राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीचे स्थान होते, तसेच आता अजिंक्यचेही आहे. तो कसोटी क्रिकेटचा आत्मा तर आहे. कारण जोहान्सबर्गपासून लॉर्ड्सपर्यंत त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत शतके झळकाविली आहेत. विंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत टी२० क्रिकेटमध्ये ३ शतके झळकाविल्यानंतरही अजिंक्य भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघात नाही. मात्र, त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे. अजिंक्यने मुश्ताक अली क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान इंदूर येथे केलेली खास बातचीत.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप पाडल्यानंतरही तू भारताच्या संघात नाहीस?
होय, माझी निवड करणे किंवा न करणे हे निवडकर्त्यांचे काम आहे. जेव्हा कधी मला राष्ट्रीय संघात संधी मिळते, तेव्हा पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी पुढचा विचार करतो. मला विश्वास आहे की, मी विश्वचषक संघात असेन.

तू मोईन अली आणि नाथन लायनच्या फिरकीचा बळी ठरत आहेत? फिरकी ही तुझी कमजोरी तर नाही?
नाही, असे म्हणू शकत नाही. कारण मी तिन्ही प्रकारांत धावा केल्या आहेत. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी खेळत असतो. तुम्हाला प्रत्येक खेळाडूचा सन्मान करावा लागतो. तुम्ही इंग्लंड व ऑस्ट्रेलिया खेळपट्टीवर माझ्या काही खेळी बघा. तुमच्या लक्षात येईल, कोणता ना कोणता गोलंदाज हा शतकवीराला बाद करत असतोच.

संघाच्या तंदुरुस्तीचा स्तर विराट कोहलीने उंचावला
हो, एक गोष्ट जरूर सांगेन की, विराटने स्वत:ला सुपर फिट ठेवून इतर खेळाडूंना प्रेरित केले. संघाचा कोणताही सदस्य मद्यपान करत नाही. स्वत: विराटने प्रोटीनच्या नावावर मांसाहार बंद केले आहे. तो केवळ फळे, हिरव्या भाज्या, ड्रायफुट्स आणि प्रोटीन शेकचे सेवन करतोय. काही खेळाडूसुद्धा त्याच्या मर्गावर आहे.

Web Title: I will definitely play in the forthcoming World Cup - Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.