परिणितीसोबतच्या प्रेमप्रकरणावर हार्दिक पांड्या म्हणतोय....

हार्दिक पंड्या आणि परिणिती यांच्यातील प्रेमाच्या चर्चेला परिणिताने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सुरुवात झाली. तिने एका सायकलचा फोटो शेअर केला. या फोटो शेअर करताना जोडीदारासोबत ट्रिपला जाण्यासाठी उत्सुक आहे, असे परिणितीने लिहिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:39 IST2017-09-10T20:37:15+5:302017-09-10T20:39:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya says on love affair with Parititi. | परिणितीसोबतच्या प्रेमप्रकरणावर हार्दिक पांड्या म्हणतोय....

परिणितीसोबतच्या प्रेमप्रकरणावर हार्दिक पांड्या म्हणतोय....

नवी दिल्ली, दि. 10 - क्रिकेटपटू आणि बॉलीवूड तारका यांच्यातील प्रेमप्रकरणे ही काही नवी गोष्ट नाही. पडद्यावरील अदाकारीने करोडो दिलांची धडकन बनलेल्या या सौंदर्यवतींचे दिल मैदानावर घाम गाळणार्‍या क्रिकेटपटूंसाठी धडकत असते. नवाब पतौडी- शर्मिला टागोर, मोहसिन खान - रिना रॉय, रवी शास्त्री-अमृता सिंग, व्हिव रिचर्डस्-नीना गुप्ता, हरभजनसिंग-गीता बत्रा ही त्यातील काही चटकन ओठावर येणारी नावे. आता या मालिकेत एक नवीन नाव जोडले गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा रंगली होती. अखेर स्वत: हार्दिक पंड्याने याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे परिणीतीसोबत माझा कोणताही संबंध नाही, असे पंड्याने म्हटले आहे. पंड्याने नुकतीच एका दैनिकाला मुलाखत दिली होती. यावेळी तो म्हणाला की, मी परिणितीला फार जवळून ओळखत नाही. यापूर्वी आमच्यात कधीही बोलणं झालेलं नाही.

मात्र, आमच्या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू आहे, अशी चर्चा रंगत असल्याचे मला ट्विटरच्या माध्यमातून कळाले. माझे कुणासोबत नाव जोडले जात आहे, याचा मी फारसा विचार करत नाही. सध्या मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. अशा गोष्टीमुळे मला हसू येते, असेही पंड्या यावेळी म्हणाला. हार्दिक पंड्या आणि परिणिती यांच्यातील प्रेमाच्या चर्चेला परिणिताने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सुरुवात झाली. तिने एका सायकलचा फोटो शेअर केला. या फोटो शेअर करताना जोडीदारासोबत ट्रिपला जाण्यासाठी उत्सुक आहे, असे कॅप्शन परिणितीने लिहिले होते.
परिणितीच्या या ट्विटवर हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली होती. परिणितीने शेअर केलेल्या फोटोची स्तुती करताना त्याने अंदाज वर्तवताना बॉलीवूड आणि क्रिकेटचा संबंध जोडला. यावर परिणितीने उत्तर दिले की, तो क्रिकेटर असूही शकतो किंवा वेगळा कोणीतरी असू शकतो. यानंतर हे सर्व गॉसिपिंग सुरू झाले.

Web Title: Hardik Pandya says on love affair with Parititi.