Happy new year wishes from Virushka in South Africa | विरुष्काच्या साऊथ आफ्रिकेतून नववर्षाच्या शुभेच्छा

केपटाऊन - भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण अफ्रिकेविरोधात होणा-या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी केपटाऊनमध्ये आहे. केपटाऊनला पोहोचल्यानंतर नुकतंच लग्नात अडकलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मानं ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत. 

नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो असं ट्विट विरुष्कानं केलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं एकाच वेळी एकसारखंच ट्विट केलं आहे. 

दरम्यान, काल विराट आणि अनुष्का केपटाऊनमधील एका शॉपमध्ये शॉपिंग करताना अढळले. शुक्रवारपासून भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधीच अनुष्कासोबत वेळ घालवण्याच्या हेतूने विराट कोहलीने शॉपिंगसाठी थोडा वेळ काढला होता. विराट आणि अनुष्काचा शॉपिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का एका दुकानाच्या बाहेर उभे आहेत जिथे 50 टक्के सेल सुरु आहे.  

या फोटोवरुन ट्विटर युजर्स विराट आणि अनुष्काची खिल्ली उडवत आहेत. विराट आणि अनुष्काचा फोटो शेअर करत एका युजरने कॅप्शन दिली आहे की, 'विराट - हे बघ अनुष्का मी 50 टक्के वाला नाही, 100 टक्के वाला आहे'. दुस-या एका युजरने लिहिलं आहे की, 'विराट कोहली वेडिंग प्लॅनरच्या बिलकडे पाहत असताना अनुष्का म्हणते चल शॉपिंगला जाऊ. विराट - मला माहितीये एक चांगली जागा'. एकाने लिहिलं आहे, 'विराटने अनुष्काला सांगितलं - रिसेप्शनवर एवढा खर्च केल्यानंतर आता सेलमध्येच शॉपिंग करावी लागणार डार्लिंग'. 

भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 5 जानेवारीपासून होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंतर दुस-या स्थानी कायम आहे तर अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या लढतीत नाबाद द्विशतकी खेळी करणाºया अ‍ॅलिस्टर कूकने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झेप घेतली आहे.