लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आजचा विजेता हा क्रिकेटला लाभलेला नवा जेता ठरणार आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार? कोणाचे पारडे जड असणार? हा चर्चा होणे साहजिकच आहे.
12:03 AM
इंग्लंड ठरली पहिल्यांदाच चॅम्पियन
11:40 PM
अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये...
11:23 PM
ट्रेंट बोल्टचा दमदार फिल्डींग
11:01 PM
इंग्लंडला पाच षटकांत ४६ धावांची गरज
10:54 PM
बेन स्टोक्सचे अर्धशतक
10:50 PM
बटलरचे दमदार अर्धशतक
10:34 PM
स्टोक्स-बटलरची जोडी जमली
10:23 PM
इंग्लंडचे सामन्यात पुनरागमन
09:14 PM
जॉनी बेअरस्टोव आऊट
08:07 PM
न्यूझीलंडच्या प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा
07:16 PM
न्यूझीलंडच्या प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा
07:03 PM
न्यूझीलंडला सहावा धक्का
05:37 PM
निकोल्स झाला क्लीन बोल्ड
05:02 PM
केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांची 74 धावांची भागीदारी लायम प्लंकेटने संपुष्टात आणली, प्लंकेटने 23व्या षटकात विलियम्सनला बाद केले. विलियम्सनने 53 चेंडूंत 30 धावा केल्या.
03:47 PM

03:47 PM

03:46 PM
सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. ख्रिस वोक्सने किवी सलामीवीर मार्टिन गुप्तीलला पायचीत केले. गुप्तील 19 धावांवर माघारी परतला.
03:37 PM
दोन दिग्गज लॉर्ड्सवर

03:25 PM
अंपायरचा योग्य निर्णय
03:25 PM
हेन्री निकोल्सचा योग्य DRS... ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पंच कुमार धर्मसेनानं निकोल्सला पायचीत दिले, परंतु त्यानं त्वरित तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली, त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे स्पष्ट दिसले.
02:38 PM
जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो लै डेंजर, Video
02:31 PM
नाणेफेक 15 मिनिट उशिरानं होणार.. 2.30 एवजी 2.45 वाजता नाणेफेक
मागील पाच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाणेफेक जिंकणारा संघ चारवेळा पराभूत झाला आहे. 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना त्याला अपवाद ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर विजय मिळवला होता.
02:27 PM
खेळपट्टीचा अंदाज काय, सांगतोय सौरव गांगुली
सकाळच्या सत्रात पाऊस पडला असला तरी आता सूर्यानं डोकं वर काढलं आहे... खेळपट्टीवर गवत आहे आणि नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणे पसंत करेल... सुरुवातीची काही षटकं जलदगती गोलंदाजांना सहकार्य करतील.
02:24 PM
इंग्लंड-न्यूझीलंड यांचा फायनलपर्यंतचा प्रवास
02:20 PM
फायनल सामन्यात कोण करणार पंच'गिरी' ?

02:19 PM
इंग्लंडचे सलामीवीर लै भारी
भक्कम सलामी हा इंग्लंडसाठी फार मोठी जमेची बाजू आहे. गेल्या चार डावांत इंग्लंडसाठी जेसन रॉय व जॉनी बेयरस्टो यांनी १२८, १६०, १२३ आणि १२४ धावांची सलामी दिलेली आहे. याउलट न्यूझीलंडच्या डावाची सलामी १, २, २९, ५, ०, १२, ० अशी डळमळीतच झालेली आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येकी दोन गोलंदाज असे आहेत ज्यांनी प्रत्येकी १५ पेक्षा अधिक बळी मिळविले आहेत.
02:17 PM
लॉर्ड्च्या मैदानावर कोणी केला हा खोडसाळपणा?

02:17 PM
बलूचिस्तानासाठी मदत करा, संशयीत वाहनानं उडवली सर्वांची झोप

02:16 PM

02:13 PM
या स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंडची धावगती ६.४३ अशी सर्वोच्च आहे, तर प्रती विकेट ४३.२६ धावा हे त्यांचे प्रमाणसुद्धा दुसरे सर्वाधिक आहे. याच्या उलट न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट हा ५.०१ असा सर्वोत्तम आणि त्यांच्या गोलंदाजांची सरासरी २७.१२ हीसुद्धा सर्वोत्तम आहे.
02:11 PM
यंदा जेसन रॉयने (४२६) आणि बेयरेस्टो (४९६) हे फॉर्ममध्ये आहेत. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री हे त्यांना कसे रोखतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. ज्यो रुटने(५४९) मधल्या फळीला आकार दिला, तर स्टोक्स हा संतुलन निर्माण करतो. गोलंदाज जोफ्रा आर्चर याने १९ आणि ख्रिस व्होक्सने १३ गडी बाद केले. लियॉम प्लंकेटनेदेखील आठ फलंदाजांना बाद केले आहे. मागच्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेले सहा खेळाडू न्यूझीलंड संघात आहेत. विलियम्सनने ५४८, तर रॉस टेलरने ३३५ धावा केल्या आहेत.
02:10 PM
जॉनी बेयरेस्टो, जेसन रॉय, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यासारख्या स्टार्सचा इंग्लंड संघ लॉर्डस्वर दावेदार वाटतो. १९७९, १९८७, १९९२ या वर्षांसारखे यंदा जेतेपद हातून निसटू नये याची काळजी या ‘टॉप’ फाईव्हना घ्यावी लागेल. १९७९ मध्ये इंग्लंड विंडीजविरुद्ध फायनल खेळला होता. १९८७ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डनवर अॅलन बॉर्डरच्या आॅस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. १९९२ साली इम्रान खानच्या पाक संघाने पुन्हा इंग्लंडला जेतेपदापासून वंचित ठेवले होते.
02:10 PM
