CSK vs SH, IPL 2018 : केन विल्यम्सनची एकाकी झुंज, चेन्नईचा 4 धावांनी विजय​​​​​​​

चेन्नई सुपरकिंग्सने अंबाती रायडू व सुरेश रैना यांच्या अर्धशतकी खेळीनंतर दीपक चहरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर रविवारी रंगतदार लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 03:32 PM2018-04-22T15:32:28+5:302018-04-23T00:16:06+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs SH, IPL 2018 Live Score: Chennai Super Kings vs SunRisers Hyderabad IPL 2018 Live Updates | CSK vs SH, IPL 2018 : केन विल्यम्सनची एकाकी झुंज, चेन्नईचा 4 धावांनी विजय​​​​​​​

CSK vs SH, IPL 2018 : केन विल्यम्सनची एकाकी झुंज, चेन्नईचा 4 धावांनी विजय​​​​​​​

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद : चेन्नई सुपरकिंग्सने अंबाती रायडू व सुरेश रैना यांच्या अर्धशतकी खेळीनंतर दीपक चहरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर रविवारी रंगतदार लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला.  चेन्नई सुपरकिंग्सने संथ सुरुवातीतून सावरताना रायडू (७९) व रैना (नाबाद ५३) यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत ३ बाद १८२ धावांची आव्हानात्मक मजल मारली. रायडू-रैना यांनी तिसºया विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. चेन्नईने अखेरच्या ११ षटकांमध्ये एक गडी गमावत १४१ धावा फटकावल्या. त्यानंतर दीपक चहरने अचूक मारा करीत सनरायझर्स हैदराबादचा डाव २० षटकांत ६ बाद १७८ धावांत रोखला. चहरने चार षटकांत १५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. कर्णधार केन विलियम्सनचे (८४) आयपीएलमधील सहावे अर्धशतक आणि युसूफ पठाणसोबत (४५) पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची केलेली भागीदारी अखेर व्यर्थच ठरली.

चेन्नई सुपरकिंग्सने पाच सामन्यांतील चौथा विजय मिळवत ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले तर सनराझर्स एवढ्याच सामन्यात सहा गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे. चहरने आपल्या पहिल्या षटकात सलामीवीर भूईला बाद केले. दुसºया षटकांत मनीष पांडे व तिसºया षटकांत दीपक हुड्डा यांना माघारी परतवत चेन्नई सुपरकिंग्सला वर्चस्व मिळवून दिले. ३ बाद २२ अशी अवस्था असताना कर्णधार विलियम्सन व शाकिब अल हसन यांनी हैदराबादचा डाव सावरला. कर्ण शर्माने शाकिबला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर विलियम्सन (५१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) आणि पठाण (२७ चेंडू, १ चौकार, ४ षटकार) यांनी संघाच्या चाहत्यांच्या आशा कायम राखल्या. ड्वेन ब्राव्होने विलियम्सनला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पुढच्याच षटकात पठाणही बाद झाला. हैदराबाद संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती, पण ते शक्य झाले नाही.

त्याआधी, अंबाती रायडू (७९) व सुरेश रैना (नाबाद ५३) यांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने ३ बाद १८२ धावांची मजल मारली. कर्णधार धोनीने अखेरच्या षटकांमध्ये १२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद २५ धावा केल्या. यजमान संघाचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाला गोलंदाज भुवनेश्वर कुमार (३ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात १ बळी), बिली स्टॅनलेक व शाकिब अल हसन यांनी चांगली सुरुवात करून दिली. भुवीने शेन वॉटसनला (९) माघारी परतवत हैदराबाद संघाला पहिले यश मिळवून दिले. ६ षटकानंतर चेन्नई सुपरकिंग्सची १ बाद २७ अशी स्थिती होती. आयपीएलच्या ११ व्या पर्वात आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावसंख्या आहे.  ड्यूप्लेसिसला (११) मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानने (१-४९) त्याला आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर तंबूचा मार्ग दाखवला. १० षटकांनंतर चेन्नई संघाने २ बाद ५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर सुरैश रैना (५३) व अम्बाती रायडू (७९) यांनी आक्रमक खेळी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. 

धावफलक

  • चेन्नई सुपरकिंग्स : शेन वॉटसन झे. हुड्डा गो. भुवी ०९, फाफ ड्यूप्लेसिस यष्टिचित साहा गो. राशिद ११, सुरेश रैना नाबाद ५३, अम्बाती रायडू धावाबाद ७९, महेंद्रसिंग धोनी नाबाद २५. अवांतर (५). एकूण २० षटकांत २ बाद १८२. बाद क्रम : १/१४, २-३२, ३-१४४. गोलंदाजी : भुवनेश्वर ३-०-२२-१, बिली स्टॅनकेल ४-०-३८-०, शाकिब-अल-हसन ४-०-३२-०, सिद्धार्थ कौल ४-०-३२-०, राशिद खान ४-०-४९-१, दीपक हुड्डा १-०-८-०.
  • सनरायझर्स हैदहाबाद :- रिकी भूई झे. वॉटसन गो. चहर ००, केन विलियम्सन झे. जडेजा गो. ब्राव्हो ८४, मनीष पांडे झे. शर्मा गो. चहर ००, दीपक हुड्डा झे. जडेजा गो. चहर ०१, शाकिब-अल-हसन झे. रैना गो. शर्मा २४, युसूफ पठाण झे. रैना गो. ठाकूर ४५, रिद्धिमान साहा नाबाद ०५, राशिद खान नाबाद १७. अवांतर (२). एकूण २० षटकांत ६ बाद १७८. बाद क्रम : १-०, २-१०, ३-२२, ४-७१, ५-१५०, ६-१५७. गोलंदाजी : दीपक चहर ४-१-१५-३, शार्दुल ठाकूर ४-०-४५-१, शेन वॉटसन २-०-२३-०, रवींद्र जडेजा ४-०-२८-०, कर्ण शर्मा ३-०-३०-१, ड्वेन ब्राव्हो ३-०-३७-१. 

 

  •  Live Updates 

07:37PM - चेन्नईचा हैदराबादवर 4 धावांनी विजय



 

07:29PM - हैदराबादला एका षटकात 19 धावांची गरज

07:26PM - युसूफ पठाण 27 चेंडूत 45 धावा काढून बाद. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रैनाकडे झेल देत झाला बाद. युसूफने चार षटकार आणि एक चौकार लगावला.  विजयासाठी 8 चेंडूत 22 धावांची गरज. 

07:18PM - केन विल्यम्सनचे शतक हुकले.

ब्राव्होनं केन विल्यम्सनला 84 धावांवर जाडेजाकरवी केलं झेलबाद. केन विल्यम्सनने 51 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकरांसह 84 धावांची खेळी केली. हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 33 धावांची गरज. युसूफ पठाण 24 चेंडूत 39 धावांवर खेळत आहे. 

07:17PM - 18 व्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेतना युसूफ पठाण जखमी. मांडीच्या मांसपेशी दुखावल्या गेल्यामुळं सामाना काहीेवेळासाठी थांबवण्यात आला आहे. युसूफ 22 चंडूत 36 धावांवर खेळत आहे. 

07:14PM - 17 व्या षटकांत हैदराबादने काढल्या 8 धावा- 18 चेंडूत 42 धावांची गरज. 

07:06PM - 16 व्या षटकांत युसूफ पठाणने 14 धावा केल्या वसूल. 

केन विल्यम्सननंतर युसूफ पठाणने फटकेबाजीला सुरुवात करत ब्राव्होच्या एका षटकांत 14 धाव वसूल केल्या. हैदराबादच्या 16 षटकानंतर चार बाद 131 धावा. केन विल्यम्सन81 आणि युसूफ पठाण 23 धावांवर खेळत आहेत. हैदराबादला विजयासाठी  24 चेंडूत 52 धावांची गरज

07:00PM -  15 व्या षटकांमध्ये केन विल्यम्सनने 22 धावा वसूल करत सामन्यात रंगत वाढवली. 15 षटकानंतर हैदराबादच्या चार बाद 117 धावा. विजयासाठी 30 चेंडूत 66 धावांची गरज. केन विल्यम्सन 45 चेंडूत 80 धावांवर खेळत आहे. 

06:58PM - 14 षटकानंतर हैदराबादच्या चार बाद 95 धावा. कर्णधार केन विल्यम्सनची फटकेबाजी सुरु

06:54PM - 13 षटकानंतर हैदराबादच्या चार बाद 84 धावा. विजयासाठी 42 चेंडूत 99 धावांची गरज

06:51PM - कर्णधार केन विल्यम्सनचे संयमी अर्धशतक

केन विल्यम्सनने 35 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.  

06:47PM - 11 षटकानंतर चार बाद 73 धावा. विजयासाठी 54 चेंडूत 110 धावांची गरज. कर्णधार केन विल्यम्सन 31 चेंडूत 46 धावांवर खेळत आहे. 

06:46 PM - हैदराबादला चौथा धक्का, शाकिब अल हसन 24 धावा काढून बाद.  कर्ण शर्मानं सुरेश रैनाकरवी केलं झेलबाद. 

06:30PM -  हैदराबादचे अर्धशतक पूर्ण 

कर्णधार केन विल्यम्सनने शकिब अल हसनच्या साथीने हैदराबादचा डाव सावरला आहे. नवव्या षटकाअखेर हैदराबादच्या 3 बाद 60 धावा झाल्या आहेत.

06:23PM - सात षटकानंतर तीन बाद 43 धावा

06:15PM - हैदराबादची पडझड,  चहारने दिले तीन धक्के. 

दिपक चहारने आपल्या तीन षटकांमध्ये सात धावा देत हैदराबादच्या तीन फलंदजांना तंबूत झाडले. मनिष पांडे, रिकी भूई आणि दिपक हुड्डाला त्याने स्वस्तात केले बाद. कर्णधार केन विल्यम्सन एका 16 चेंडूत 26 धावांवर खेळत आहे.  हैदराबादच्या पाच षटकानंतर तीन बाद 28 धावां

06:00PM  - दिपक चहरने हैदराबादला दोन धक्के दिले. 

दिपक चहरने रिकी भुईनंतर मनिष पांडेला 00 धावांवर बाद करत चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. कर्णधार केन विल्यम्सन 7 चेंडूत 11 धावांवर खेळत आहे.  3 षटकानंतर हैदराबादने दोन बाद 11 धावा केल्या आहेत. 

05:57PM - दिपक चहरने पहिले षटक निर्धाव टाकताना हैदाराबदला एक धक्काही दिला.  आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रिकी भुईला वॉटसनकरवी केले झेलबाद. 

05:56PM - हैदराबादला पहिला धक्का, रिकी भुई खाते न उघडता झाला बाद

05:51PM - रिकी भुई आणि कर्णधार केन विल्यम्सन हैदराबादकडून करणार डावाची सुरुवात.  चेन्नईकडून दीपक चाहर पहिले षटक घेऊन आला

रायुडू-रैनाची अर्धशतके, हैदराबादपुढे 183 धावांचे आव्हान

अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि कर्णधार एम.एस. धोनी यांच्या तुफान फटकेबाजीच्या जौरावर चेन्नई संघाने निर्धारित 20 षटकांत तीन बाद 182 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादला विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या दहा षटकांत हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फंलदाजांना धावा काढण्यापासून रोखलं. चेन्नईच्या गेल्या सामन्यात शतकी खेळी करुन विजयात मोलाची भूमिका बजावाणाऱ्या वॉटसनला भुवनेश्वरकुमारने स्वस्तात बाद केले. बॉटसनने 15 चेंडूत फक्त 9 धावा करता आल्या. दुसरा सलामिवीर फाफ डु प्‍लेसिलसाही फारशी चमक दाखता आला नाही. फाफ डु प्‍लेसिसही 13 चेंडूत 11 धावांवर बाद झाला. पहिल्या दहा षटकांत चेन्नईला फक्त 54 धावा करता आल्या. चौथ्या स्थानावर आलेल्या रायुडूने सर्व सुत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी केली

रैनाने संयमी खेळी करत संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसरीकडे रायुडूने षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. रायुडूने 37 चेंडूत 9 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी साकारली. शतकाकडे कूच करणारा रायुडू धावबाद झाला.  रायुडू बाद झाल्यानंतर धोनीने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. धोनीने 12 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. अनुभवी रैनाने आज संयमी फंलदाजी केली. रैनाने  43 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकांरासह 53 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 

05:37PM - निर्धारित 20 षटकांत चेन्नईने तीन बाद 182 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादला विजयासाठी 183 धावांचे आव्हान

05:31PM - रैनाचे अर्धशतक, धोनीची फटकेबाजी

19 षटकानंतर चेन्नईच्या तीन बाद 171 धावा, सुरेश रैनाने संयमी अर्धशतक केले.  40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतक केले पूर्ण.  धोनी 8 चेंडूत 16 धावांवर खेळत आहे. 19 व्या षटकांत 14 धावा काढल्या. 

05:26PM - 18 षटकानंतर चेन्नईच्या तीन बाद 157 धावा. रैना 47 धावांवर खेळत आहे.

05:20PM - रायुडू बाद, चैन्नईला मोठा धक्का

शतकाकडे वाटचाल करणारा अंबाती रायुडू 79 धावांवर बाद झाला. रायडुने 9 चौकार आणि चार षटकार लगावले. चेन्नईच्या 17 षटकानंतर तीन बाद 146 धावा. 

05:16PM -  16 षटकानंतर चेन्नईच्या दोन बाद 137 धावा. रायुडू 73 आणि रैना 40 धावांवर खेळत आहेत.

05:15PM - रायुडूची फटकेबाजी, हैदराबादची गोलंदाजी काढली फोडून

33 चेंडूत रायुजू32 धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान त्याने चार षटकार आणि 8 चौकार लगावले

05:05PM - रायुडूने षटकार मारत चेन्नईचे शतक लावले फलकावर

14 व्या षटकांत रायुडूने तीन चौकार आणि एका षटकारांसह 19 धावा करत संघाचे शतक फलकावर लावले. रायुडूने 27 चेंडूत अर्धशतक केले पूर्ण 

05:05PM -  शेवटच्या 25 चेंडूत रैना-रायुडूने 48 धावा केल्या कुटल्या

05:00PM -  सुरेश रैना- रायुडूची फटकेबाजी सुरु

सुरेश रैना- रायुडूने संथ फलंदाजीनंतर फटकेबाजीला सुरुवात केली. राशीद खानच्या दुसऱ्या षटकात रैनाने दोन षटकारांसह 16 धावा वसूल केल्या तर शाकिबच्या तिसऱ्या षटकांत 9 धावा वसूल करत 13 षटकानंतर संघाची धावसंख्या दोन बाद 87 पर्यंत पोहचवली. सुरेश रैना 30 चेंडूत 33 तर रायुडू 20 चेंडूत 30 धावांवर खेळत आहेत.  

04:48PM - दहा षटकानंतर चेन्नईच्या दोन बाद 54 धावा, रैना-रायुडू जोडी मैदानावर

04:39PM - 9 षटकांनतर चेन्नईच्या दोन बाद 41 धावा,  रायुडू सहा चेंडूत सात तर सुरेश रैना 20 चेंडूत 11 धावांवर खेळत आहेत.  

04:31PM -  हैदराबादचा भेदक मारा, चेन्नईला दुसरा धक्का

रैना- ड्यू प्लेसिस जोडीने संयमी फंलदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण अफगाणीस्थानचा फिरकी गोलंजदाज राशीद खानने ड्यूप्लेसिसला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला.  सुरेश रैना 16 चेंडूत 10 धावावर संयमी फंलदाजी करत आहे. रायुडू पाच चेंडूत चार धावांवर खेळत आहे. आठ षटकानंतर चेन्नईची दोन बाद 37 धावा झाल्या आहेत. 

04:25PM - सहा षटकानंतर चेन्नईच्या एक बाद 27 धावा, रैना -फाफ डु प्‍लेसिस जोडीची संयमी फंलदाजी

04:20PM - पाट षटकानंतर चेन्नईच्या एक बाद 21 धावा. सुरेश रैना 7 आणि फाफ डु प्‍लेसिस 4 धावांवर खेळत आहेत. 

04:15PM - चेन्नईला मोठा धक्का, शेन वॉटसन बाद

गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या वॉटसला भुवनेश्वर कुमारने दिपक हुड्डा करवी झेलबाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला.  भुवनेश्वर कुमारने आपल्या दुसऱ्या षटकात दोन धावा देताना वॉटसनची मोठी विकेट घेतली. चार षटकानंतर चेन्नईने एक बाद 15 धावा केल्या आहे. वॉटसनची जागा सुरेश रैनाने घेतली आहे. रैना आणि ड्युप्लिसेस मैदानावर आहेत. 

04:10PM - हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फंलदाजांना घातली वेसन - 

भुवनेश्ववर, बिली स्‍टेनलेक आणि शाकिब यांनी चेनन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले. भुवनेश्वरने पिहिल्या षटकात तीन धावा दिल्या. त्यानंतर बिली स्‍टेनलेकने एक धाव दिली. या दोन वेगवान गोलंदाजाप्रमाणे शाकिबनेही फक्त तीन धावा देत चेन्नईच्या फंलदाजांना वेसन घातली . 

04:03PM - भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात भेदक मारा केला. चेन्नईच्या फंलदाजांना फक्त 3 धावा काढता आल्या.

04:00PM - शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस चेन्नईकडून करणार डावाची सुरुवात. तर भुवनेश्वर कुमार हैदराबादकडून करणार गोलंदाजीची सुरुवात

03:38PM -  हैदराबाद संघ -  

केन विल्यमसन (कप्‍तान),  साहा, यूसुफ पठान, मनीष पांडे, दीपक हूड्डा, शाकिब अल हसन, रिकी भुई, भुवनेश्‍वर कुमार, राशिद खान, बिली स्‍टेनलेक आणि सिद्धार्थ कौल


03:38PM -  असा आहे चेन्नई संघ -  

एमएस धोनी (कप्‍तान), शेन वॉटसन, अंबाती रायडू, सुरेश रैना, फाफ डु प्‍लेसिस, सॅम बिलिंग्‍स, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, कर्ण शर्मा आणि शार्दुल ठाकूर.


 

03:32PM : हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई करणार प्रथम फलंदाजी. हैदराबादचा अनुभवी फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळं या सामन्यात खेळणार नाही. 



 

03:10PM -  चेन्नई आणि हैदराबाद संघाचे मैदानावर आगमन



दोन्ही संघ - 

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई. 

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मनीष पांडे, रिकी भुई, सचिन बेबी, शिखर धवन, तन्मय अगरवाल, बिपुल शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, दीपक हुडा, मेहंदी हसन, मोहम्मद नबी, शाकीब अल हसन, यूसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, ख्रिस जॉर्डनस, खलिल अहमद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, थंगारसू नटराजन. 

Web Title: CSK vs SH, IPL 2018 Live Score: Chennai Super Kings vs SunRisers Hyderabad IPL 2018 Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.