CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ

रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग या दोघांनी तिखट मारा करत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळे बंगळुरुला 127 धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईने हे माफक आव्हान सहा विकेट्स आणि 12 चेंडू राखून सहज पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 04:31 PM2018-05-05T16:31:45+5:302018-05-05T19:38:19+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs RCB, IPL 2018 LIVE: Chennai won the toss and elected to bowl | CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ

CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थान पुन्हा एकदा पटकावले आहे.

विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ



 

बंगळुरुवर विजयासह चेन्नई अव्वल स्थानी

पुणे : रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग या चेन्नई सुपर किंग्जच्या फिरकीपटूंच्या भेदक माऱ्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांची चांगलीच गिरकी घेतली. या दोघांनी तिखट मारा करत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळे बंगळुरुला 127 धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईने हे माफक आव्हान सहा विकेट्स आणि 12 चेंडू राखून सहज पूर्ण केले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थान पुन्हा एकदा पटकावले आहे.

7.10 PM : धोनीच्या चौकाराने चेन्नईचे शतक पूर्ण

6.50 PM : चेन्नईला चौथा धक्का; ध्रुव शौरी बाद

6.44 PM : चेन्नईला तिसरा धक्का; अंबाती रायुडू बाद

6.30 PM : टीम साऊथीने टीपला रैनाचा अप्रतिम झेल; चेन्नईला दुसरा धक्का

- उमेश यादवच्या नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टीम साऊथीने सुरेश रैनाचा अप्रतिम झेल सीमारेषेवर पकडला. रैनाने दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 25 धावा केला.

धोनी कसे करतो नेतृत्व... पाहा हा व्हीडीआो



 

6.12 PM : चेन्नई पाच षटकांत 1 बाद 26

6.01 PM : चेन्नईला पहिला धक्का; शेन वॉटसन बाद

5.52 PM : दुसऱ्या चेंडूवरही शेन वॉटसनचा चौकार

5.50 PM : पहिल्याच चेंडूवर शेन वॉटसनचा चौकार

5.35 PM : बंगळुरुचे चेन्नईपुढे 128 धावांचे आव्हान

धोनी सेनेला चाहत्यांचा जबरदस्त पाठिंबा... पाहा हा व्हीडिओ



 

5.19 PM : बंगळुरुचे अठराव्या षटकात शतक पूर्ण

5.10 PM : बंगळुरुला आठवा धक्का; उमेश यादव बाद

5.02 PM : कॉलिन डी ग्रँडहोम बाद; बंगळुरुला सातवा धक्का

- चेन्नईचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने कॉलिन डी ग्रँडहोमला बाद केले, बंगळुरुसाठी हा सातवा धक्का होता.

4.58 PM : बंगळुरुला सहावा धक्का; अर्धशतकवीर मुरुग्गन अश्विन बाद

- हरभजन सिंगने धोनीवकरवी मुरुग्गन अश्विनला यष्टीचीत करत तंबूत धाडले. बंगळुरुसाठी हा सहावा धक्का होता.

4.55 PM : बंगळुरुला मोठा धक्का; अर्धशतकवीर पार्थिव पटेल बाद

- अर्धशतक शतक झळकावल्यानंतर पार्थिवला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. पार्थिवने जडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. जडेजाने 41 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 53 धावा केल्या.

4.51 PM : पार्थिव पटेलने बंगळुरुचा डाव सावरत अर्धशतक पूर्ण केले.

4.45 PM : बंगळुरुला चौथा धक्का; मनदीप सिंग बाद

- जडेजाने मनदीप सिंगला बाद करत बंगळुरुला चौथा धक्का दिला. मनदीपने सात धावा केल्या.

4.34 PM : बंगळुरुला तिसरा धक्का; एबी डी'व्हिलियर्स बाद

- संघात पुनरागमन करणाऱ्या डी'व्हिलियर्सला जडेजाने धोनीकरवी यष्टीचीत केले. डी'व्हिलियर्स फक्त एकच धाव काढता आली. 

4.30 PM : बंगळुरुला मोठा धक्का; विराट कोहली OUT

- रवींद्र जडेजाने कोहलीला त्रिफळाचीत करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. कोहलीला फक्त आठ धावा करता आल्या.

4.22 PM : बंगळुरु पाच षटकांत 1 बाद 37

- बंगळुरुच्या पार्थिव पटेलने संघाला सावरले आणि बंगळुरुला पाच षटकांत 37 धावा करून दिल्या.

4.08 PM : बंगळुरुला पहिला धक्का; ब्रेंडन मॅक्युलम बाद

- चेन्नईच्या लुंगी एनगिडीने दुसऱ्याच षटकात ब्रेंडन मॅक्युलमला बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला.

3.40 PM : चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली



 

 

आजी-माजी कर्णधार समोरासमोर; चेन्नई-बंगळुरु यांच्यात सामना

पुणे :  विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी, हे भारताचे दोन आजी व माजी कर्णधार आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा सामना जिंकून चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर पुन्हा जाणार की बंगळुरुचे स्पर्धेतील आव्हान कायम राहणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

 

दोन्ही संघ



 



 

Web Title: CSK vs RCB, IPL 2018 LIVE: Chennai won the toss and elected to bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.