अमेरिकेत सापडला 'कॅप्टन कूल' धोनीचा जबरा फॅन, CSKने केले सॅल्यूट!

भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा ( CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जगभरात चाहतावर्ग आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:16 PM2018-12-22T15:16:18+5:302018-12-22T15:19:17+5:30

whatsapp join usJoin us
CSK left surprised over an 'MS Dhoni' number plate found on fan's car in Los Angeles | अमेरिकेत सापडला 'कॅप्टन कूल' धोनीचा जबरा फॅन, CSKने केले सॅल्यूट!

अमेरिकेत सापडला 'कॅप्टन कूल' धोनीचा जबरा फॅन, CSKने केले सॅल्यूट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअमेरिकेत सापडला माहीचा जबरा फॅनचेन्नई सुपर किंग्ज संघालाही वाटले आश्चर्य ट्विटरवर केले पोस्ट, चाहत्यांनीही केले कौतुक

मुंबई, आयपीएल : भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा ( CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जगभरात चाहतावर्ग आहे. जगभरातील क्रिकेट चाहते त्याच्या बॅटींग शैलीवरच नव्हे, तर यष्टिमागील त्याच्या चपळतेने घायाळ आहेत. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे CSKला धोनीचा जबरा फॅन सापडला आहे. CSKने त्यांच्या ट्विटर हँडलवर या जबरा फॅनची साक्ष देणारा फोटो पोस्ट करून धोनीला सॅल्यूट केले आहे. लॉस एंजेलिस येथील चाहत्याने चक्क त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवर MS DHONI असे नाव लिहिले आहे. 
"@ChennaiIPL A Car number in LA. Must be a great fan of MSD. Clicked by one of my friend. #MSD," tweeted a fan to which CSK's Twitter handle replied: "Aaah, so the legendary Soppanasundhari is now in LA! #WhistlePodu #Thala"



स्पॉट फिक्सिंगच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने 2018च्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचे हे तिसरे जेतेपद ठरले. 2019मध्येही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघा जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. 2019च्या मोसमासाठी चेन्नईने गोलंदाज मोहित शर्मा ( 5 कोटी) आणि रुतूराज गायकवाड (20 लाख) यांना करारबद्ध केले आहे. 



धोनी सध्या विश्रांतीवर आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संघात स्थान देण्यात आले नव्हते. तसेच 37 वर्षीय धोनी रणजी करंडक स्पर्धेत झारखंड संघाकडूनही खेळत नाही.  







 

Web Title: CSK left surprised over an 'MS Dhoni' number plate found on fan's car in Los Angeles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.