गौतमला न्यायालयाचा गंभीर झटका, हायकोर्टाने फेटाळली याचिका 

भारतीय संघातील क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 09:49 PM2017-12-14T21:49:52+5:302017-12-14T21:51:13+5:30

whatsapp join usJoin us
Court rejects Gautam plea, High Court rejects plea | गौतमला न्यायालयाचा गंभीर झटका, हायकोर्टाने फेटाळली याचिका 

गौतमला न्यायालयाचा गंभीर झटका, हायकोर्टाने फेटाळली याचिका 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघातील क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिला.

पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाक परिसरात डीएसपी आणि कंपनीचे दोन पब आहेत. घुंघरू आणि हवालात अशी त्यांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पब मालकाचंही नाव गौतम गंभीर आहे. या पबची जाहिरात बाय गौतम गंभीर अशी केली जाते.  मात्र हे पब आपलेच आहेत अशी लोकांची धारणा होत आहे, त्यामुळे गौतम गंभीर हे नाव हटवावं, अशी मागणी क्रिकेटपटू गंभीरने केली होती. या नावामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचंही गंभीरने याचिकेत म्हटलं होतं. पण कंपनीने कोर्टात दावा केला की, मालकाचं नावही गौतम गंभीर असल्यामुळे आम्ही तेच वापरत आहोत. कोर्टाने कंपनीचं म्हणणं मान्य करत, क्रिकेटपटू गंभीरला झटका देत, त्याची याचिका फेटाळली.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करणारा गौतम गंभीर सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. गंभीर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2016 मध्ये, तर शेवटचा वन डे सामना जानेवारी 2013 मध्ये खेळला आहे.

Web Title: Court rejects Gautam plea, High Court rejects plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.