वर्षभराच्या बंदीला आव्हान नाही, स्टीव्ह स्मिथचा निर्णय

‘मला पुन्हा आॅस्ट्रेलियाकडून खेळण्याची तीव्र इच्छा आहे. पण चेंडू कुरतडल्याप्रकरणी सुनावलेल्या वर्षभराच्या बंदीच्या शिक्षेला मी आव्हान देणार नाही,’ असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी स्पष्ट केले .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:52 AM2018-04-05T01:52:28+5:302018-04-05T01:52:28+5:30

whatsapp join usJoin us
Challenge of a year's ban is not a challenge, Steve Smith's decision | वर्षभराच्या बंदीला आव्हान नाही, स्टीव्ह स्मिथचा निर्णय

वर्षभराच्या बंदीला आव्हान नाही, स्टीव्ह स्मिथचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न - ‘मला पुन्हा आॅस्ट्रेलियाकडून खेळण्याची तीव्र इच्छा आहे. पण चेंडू कुरतडल्याप्रकरणी सुनावलेल्या वर्षभराच्या बंदीच्या शिक्षेला मी आव्हान देणार नाही,’ असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी स्पष्ट केले .
क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या चेंडू कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने मागच्या आठवड्यात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर वर्षभराची बंदी घातली. प्रत्यक्ष चेंडू कुरतडणारा सलामीवीर कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यात या तिघांनी कट रचला होता. या तिघांनी चूक कबूल केली. स्मिथ आणि वॉर्नरला जाहीर पत्रकार परिषदेत चूक कबूल करताना रडू कोसळले होते. त्यामुळे त्या तिघांबद्दल आॅस्ट्रेलियासह क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती व्यक्त होत आहे. गुरुवारपर्यंत या तिघांना शिक्षा मान्य करणार की शिक्षेला आव्हान देणार ते क्रिकेट आॅस्ट्रेलियाला कळवायचे आहे. शिक्षेला आव्हान देण्याचा तिघांनाही अधिकार आहे. वॉर्नर आणि बेनक्रॉफ्टने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. पण स्मिथने सोशल मीडियावरुन आपण पूर्ण वर्षभराची बंदीची शिक्षा भोगणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Challenge of a year's ban is not a challenge, Steve Smith's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.