Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान

मुशफिकरने यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेतला. मुशफिकरने 150 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 144 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 09:04 PM2018-09-15T21:04:32+5:302018-09-15T21:06:05+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: Mushfiqur Rahim's Century; Bangladesh set 262 runs target to Sri Lanka | Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान

Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुशफिकरची आतापर्यंतची ही सर्वाधिक धावांची खेळी आहे. यापूर्वी मुशफिकरने भारताविरुद्ध 117 धावांची खेळी साकारली होती.

दुबई, आशिया चषक 2018 : मुशफिकर रहिमच्या झुंजार शतकाच्या जोरावर बांगलादेशनेआशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान ठेवले आहे.


मुशफिकरने यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेतला. मुशफिकरने 150 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 144 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकत मुशफिकर दीडशतकासमीप पोहोचला होता. पण तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि त्याचे दीडशे धावा फटकावण्याचे स्वप्व हवेत विरले. मुशफिकरची आतापर्यंतची ही सर्वाधिक धावांची खेळी आहे. यापूर्वी मुशफिकरने भारताविरुद्ध 117 धावांची खेळी साकारली होती. मुशफिकरची श्रीलंकेविरुद्धचे हे पहिले शतक आहे. मुशफिकरच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशला 261 धावा करता आल्या. मलिंगाने यावेळी भेदक मारा करत 10 षटकांत 23 धावा देत चार बळी मिळवले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. कारण पहिल्याच षटकात त्यांना दोन फलंदाज गमवावे लागले. जवळपास एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने बांगलादेशला दुहेरी धक्के दिले.

बांगलादेशची पहिल्याच षटकात 2 बाद 1 अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर रहिम आणि मिथून यांनी 131 धावांची भागीदारी रचली आणि संघाला सावरले. मिथूनने 63 धावांची खेळी साकारली, पण अखेर तो मलिंगाचाच बळी ठरला. पण मुशफिकरने मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजीचा कडवा प्रतिकार केला. 


Web Title: Asia Cup 2018: Mushfiqur Rahim's Century; Bangladesh set 262 runs target to Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.