दुबई, आशिया चषक २०१८: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दुबईत दाखल झाला आहे. आशियाचषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबरला हॉंगकॉंगशी होणार आहे. समोर दुबळा प्रतिस्पर्धी असला तरी भारतीय संघ कोणालाही कमी लेखण्याची चूक करणार नाही. त्यामुळेच दुबईत दाखल होताच थोड्याशा विश्रांतीनंतर भारतीय खेळाडू जोमाने सरावाला लागले. 
नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने कर्णधाराची जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली आहे. रोहितही आपल्या नेतृत्वाखाली भारताला चौथे जेतेपद जिंकून देण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या मदतीला फलंदाजीत शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव, मनिष पांडे, अंबाती रायडू, 
महेंद्रसिंग धोनी ही फौज आहे. 
दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकणाऱ्या भुवनेश्वर कुमारनेही गोलंदाजीचा कसून सराव केला. त्याने तंदुरुस्तीची चाचणी पास करत भारतीय संघात कमबॅक केले.