आक्रमक विराट कोहलीला सगळ्यात जास्त आवडतो 'हा' कूssल खेळाडू

कोहली नेहमीच मैदानात आक्रमक पाहायला मिळतो. त्यामुळे त्यालाही आक्रमक असलेल्या व्यक्ती आवडत असतील, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. कारण आक्रमक कोहलीला 'हा' कूssल खेळाडू सगळ्यात जास्त आवडतो, दस्तुरखुद्द कोहलीनेच असे सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 02:31 PM2018-03-15T14:31:27+5:302018-03-15T14:31:27+5:30

whatsapp join usJoin us
Aggressive Virat Kohli most loved 'this' cool player | आक्रमक विराट कोहलीला सगळ्यात जास्त आवडतो 'हा' कूssल खेळाडू

आक्रमक विराट कोहलीला सगळ्यात जास्त आवडतो 'हा' कूssल खेळाडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देतुझा सर्वात आवडता खेळाडू कोण? असा सवाल कोहलीला विचारण्यात आला होता. यावेळी तो भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव घेईल, असे बऱ्याच जणांना वाटत होते.

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा किती आक्रमक आहे, हे सांगणे न बरे. कारण कोहली नेहमीच मैदानात आक्रमक पाहायला मिळतो. त्यामुळे त्यालाही आक्रमक असलेल्या व्यक्ती आवडत असतील, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. कारण आक्रमक कोहलीला 'हा' कूssल खेळाडू सगळ्यात जास्त आवडतो, दस्तुरखुद्द कोहलीनेच असे सांगितले आहे.

तुझा सर्वात आवडता खेळाडू कोण? असा सवाल कोहलीला विचारण्यात आला होता. यावेळी तो भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव घेईल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण कोहलीने आपला आवडता खेळाडू म्हणून नाव घेतले ते दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे. फेडरर 36व्या वर्षींही ज्यापद्धतीने खेळत आहे, ते पाहणे नजाकतभरे आहे, असे कोहलीने म्हटले आहे.

यापूर्वी जेव्हा कोहलीला आवडता खेळाडू कोण? असे विचारले होते. तेव्हा त्याने सचिनचे नाव घेतले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी साकारल्यावर कोहलीने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सचिनला कुर्निसात केला होता. त्याचबरोबर सचिनबद्दल तो नेहमीच भरभरून बोलताना साऱ्यांनीच पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी तो रोनाल्डोच्या प्रेमातही होता. पण त्याने फेडररचे नाव घेतल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

फेडररबाबत कोहली म्हणाला की, " फेडरर हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. त्याचा खेळ पाहणे म्हणजे एक मेजवानीच असते. त्याच्या खेळात सुंदरता आहे. या वयातही तो ज्यापद्धतीने खेळ करतो, ते पाहता त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायला हवा. त्याच्याबद्दल माझ्या मनात कायम आदरच असेल."

Web Title: Aggressive Virat Kohli most loved 'this' cool player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.