MLA Adv. Akash Phundkar has ruled the right to vote | आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदार संघातील खामगाव विधानसभा मतदार संघात आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी परिवारासह सकाळी ११:३० वाजता मतदान केले.

चांदे कॉलनीतील नगर पालिका शाळा क्रमांक १२ या मतदान केंद्रावर आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, भाजपा मिडीया सेलचे राज्य कार्यकारिणी सदस्य सागर फुंडकर, सौ. अर्पणाताई सागर फुंडकर आणि लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या पत्नी सुनिताताई फुंडकर यांनी मदतानाचा हक्क बजावला. मतदानासाठी अ‍ॅड. आकाश फुंडकर आपल्या परिवारासह अर्धातास रांगेत उभं होते. यावेळी अनेकांनी त्यांना पुढे येण्याची विनंती केली. मात्र, कोणताही बडेजाव न करता सामान्य मतदाराप्रमाणेच आमदार आकाश फुंडकर आणि फुंडकर परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.


Web Title: MLA Adv. Akash Phundkar has ruled the right to vote
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.