​युवराज सिंहची ‘बेटरहाफ’ हेजल किचबद्दल ‘ही’ कसली अफवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 10:42 AM2017-09-14T10:42:57+5:302017-09-14T16:16:53+5:30

गतवर्षी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल किच दोघेही विवाहबंधनात अडकले होते. येत्या डिसेंबरमध्ये युवी व हेजलच्या  लग्नाना एक ...

Yuvraj Singh's 'Butterhoff', 'This' rumor about the hedgehog? | ​युवराज सिंहची ‘बेटरहाफ’ हेजल किचबद्दल ‘ही’ कसली अफवा?

​युवराज सिंहची ‘बेटरहाफ’ हेजल किचबद्दल ‘ही’ कसली अफवा?

googlenewsNext
वर्षी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल किच दोघेही विवाहबंधनात अडकले होते. येत्या डिसेंबरमध्ये युवी व हेजलच्या  लग्नाना एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण आता लग्नाच्या वाढदिवसाचे प्लानिंग करायचे सोडून हे कपल वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे.  काय तर हेजल प्रेग्नंट आहे. होय, सध्या युवीची बेटरहाफ हेजल प्रेग्नंट असल्याचीच चर्चा आहे. अर्थात हेजलने या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. बेबी होईल, तेव्हा लोकांना कळेलच. आत्तापासून तर्क काढण्यात अर्थ नाही, असे तिने म्हटले आहे.



आता प्रश्न आहे, तो या बातमीला तोंड फुटलेच कसे? तर त्याचे झाले असे की, युवराज आणि हेजलचा एअरपोर्टवरचा एक फोटो व्हायरल झाला आणि पाठोपाठ हेजल प्रेग्नंट असल्याची बातमीही व्हायरल झाली. कारण एअरपोर्टवरच्या त्या फोटोत हेजलचे पोट सुटलेले दिसत होते. त्यावरून हेजल प्रेग्नंट आहे, हा निष्कर्ष निघाला.
 मग काय, हेजल जिथे जाईल तिथे तिला तिच्या प्रेग्नंसीबद्दल विचारण्यात आले. पण हेजलने या बातमीचा इन्कार केला. मी प्रेग्नंट नाहीय. ही बातमी कशी, कुठून लोकांना कळली माहिती नाही. पण सध्या तरी मी आणि युवीने कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही.  प्रेग्नंट राहिल्यानंतर मला घरी राहावे लागेल. तूर्तास तरी ते शक्य नाही. कारण कामासाठी मला प्रचंड ट्रव्हलिंग करावे लागतेय. केवळ मीच नाही तर युवी सुद्धा बिझी आहे.  आम्ही स्वत:लाच पुरेसा वेळ देऊ शकत नसताना कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेणे मूर्खपणा ठरेल. अर्थात जेव्हा केव्हा आम्ही बाळाचे प्लानिंग करू आणि प्रत्यक्ष मला बाळ होईल, तेव्हा सगळ्यांनाच कळेल, असे हेजल म्हणाली.

ALSO READ : ....आणि युवी झाला हेजलचा!

आता हेजलच्या बोलण्यावरून एक गोष्ट तर निश्चित आहे. ती म्हणजे, सध्या तरी ती प्रेग्नंसीच्या मूडमध्ये नाही. वर्षभर डेट केल्यानंतर युवी व हेजल या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी युवीचे नाव  किम शर्मा, दीपिका पादुकोण  अशा अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. 

Web Title: Yuvraj Singh's 'Butterhoff', 'This' rumor about the hedgehog?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.