कियारा अडवाणीने या अभिनेत्रीमुळे ठेवले तिचे कियारा हे नाव

By प्राजक्ता चिटणीस | Published: June 10, 2019 07:15 AM2019-06-10T07:15:00+5:302019-06-10T07:15:01+5:30

कियारा आता कबीर सिंग या चित्रपटात शाहिद कपूरसोबत नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

This is why Kiara advani choose her name as kiara reveal in Kabir Singh promotion | कियारा अडवाणीने या अभिनेत्रीमुळे ठेवले तिचे कियारा हे नाव

कियारा अडवाणीने या अभिनेत्रीमुळे ठेवले तिचे कियारा हे नाव

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियांका चोप्राच्या अंजाना अंजानी या चित्रपटात तिचे नाव कियारा होते. या चित्रपटात ती हाय आय अ‍ॅम कियारा हे ज्या पद्धतीने बोलते ते मला खूपच आवडले होते.

कियारा अडवाणीने फग्ली या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. पण लस्ट स्टोरी या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. 

कियारा आता कबीर सिंग या चित्रपटात शाहिद कपूरसोबत नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लोकमतशी मारलेल्या गप्पांमध्ये तिने तिचे आलिया हे नाव बदलून कियाराच का ठेवले याविषयी सांगितले. ती सांगते, माझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले. सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले.

प्रियांका चोप्राच्या अंजाना अंजानी या चित्रपटात तिचे नाव कियारा होते. या चित्रपटात ती हाय आय अ‍ॅम कियारा हे ज्या पद्धतीने बोलते ते मला खूपच आवडले होते. त्यामुळे भविष्यात माझ्या मुलीचे नाव कियारा ठेवेन असे मी ठरवले होते. बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना नाव बदलण्याचा ज्यावेळी विषय निघाला, त्यावेळी मी विचार केला की, मला कियारा हे नाव इतके आवडते तर मी हेच नाव का नको ठेवू... 

कबीर सिंग या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. या चित्रपटातील गाण्यांना देखील रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विशेष करून आतापर्यंत न दिसलेल्या अशा एका वेगळ्या अंदाजात आपल्याला कियाराला पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटातील लूकची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. कियारा स्वतः कबीर सिंगमधील भूमिका साकारून खूप खूश आहे. तिच्या मते प्रितीची भूमिका तिच्या करियरला कलाटणी देणारी ठरेल.

Web Title: This is why Kiara advani choose her name as kiara reveal in Kabir Singh promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.