काय म्हणून उदय चोप्राला विकावा लागला कोट्यवधीचा विला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:33 IST2018-06-06T12:03:56+5:302018-06-06T17:33:56+5:30
बॉलिवूडमधून पुरता गायब असलेला अभिनेता उदय चोप्रा अलीकडे चर्चेत असतो तो केवळ त्याच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे. अधूनमधून नर्गिस फाखरीसोबतच्या त्याच्या ...

काय म्हणून उदय चोप्राला विकावा लागला कोट्यवधीचा विला?
ॉलिवूडमधून पुरता गायब असलेला अभिनेता उदय चोप्रा अलीकडे चर्चेत असतो तो केवळ त्याच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे. अधूनमधून नर्गिस फाखरीसोबतच्या त्याच्या रिलेशनशिपच्या बातम्या येतात. (आता तर नर्गिसही उदयला सोडून एका अमेरिकन दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्याचे कानावर येतेय.) पण त्यापलीकडे उदय कुठेही नाही. ना तो बॉलिवूडच्या कुठल्या इव्हेंटमध्ये दिसत, ना कुठल्या चित्रपटात. एकंदर सांगायचे काय तर सध्या उदयच्या हाताला काहीही काम नाहीये. आता तर हाताला काम नसल्याने उदयला त्याचा लॉस एंजिल्स येथील हॉलिवूड हिल्स येथे असलेला बंगला विकावा लागल्याचीही खबर आहे. होय, लॉस एंजिल्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा दोन मजली विला उदय चोप्राने दोन वर्षांपूर्वी 3.025 मिलियन डॉलरला खरेदी केला होता. हा विला 3.799 मिलियन डॉलरला विकला जात असल्याची खबर आली आहे. आता उदय चोप्रावर हा कोट्यवधीचा विला विकण्याची वेळ का यावी, हे कळायला मार्ग नाहीये.
उदयचा हा विला खास अंदाजात डिझाईन केला गेला आहे. याच्या बहुतांश भिंती काचेच्या आहेत. पहिल्या माळ्यावर 3 ते 4 बेडरूम्स आहेत. येथील मास्टर सेट सर्वाधिक शानदार आहे. तो खास लाकडाने बनवण्यात आला आहे.
ALSO READ : रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब, वाढले वजन!! ‘या’ उदय चोप्राला तुम्ही ओळखता?
यश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. त्याने २००० सालच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या रूपात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘धूम’च्या सीक्वलमध्ये तो दिसला़ २०१२मध्ये उदयने ‘योमिक्स’ नावरची स्वत:ची कंपनी स्थाापन केली. ही कंपनी यशराज बॅनरच्या सुपरहिट चित्रपटांवर आधारित कॉमिक्स तयार करते.