विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'चे शूटिंग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 02:55 PM2018-07-12T14:55:45+5:302018-07-12T15:04:40+5:30

विशाल भारव्दाज सान्या मल्होत्रा आणि राधिका मदनला घेऊन नवा सिनेमा घेऊन येतायेत. हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे.

Vishal Bharadwaj's 'Patacha' shoot complete | विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'चे शूटिंग पूर्ण

विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'चे शूटिंग पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देसिनेमाची कथा राजस्थानमधील दोन बहीणींची भवती फिरणारी आहेराजस्थानमध्ये घडणारी ही कथा आहे

विशाल भारव्दाज सान्या मल्होत्रा आणि राधिका मदनला घेऊन नवा सिनेमा घेऊन येतायेत. हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे. यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पटाखा 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चरण सिंग पथिक यांच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाची कथा राजस्थानमधील दोन बहीणींची भवती फिरणारी आहे. बडकी आणि छुटकी नावाच्या दोन बहिणी नेहमी एकमेकींशी भांडत असतात. मात्र लग्न झाल्यावर त्यांना कळते की त्या एकमेकींशिवाय राहु शकत नाही. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. सुनील ग्रोव्हर आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याआधी सुनील ग्रोव्हरने गजनी सिनेमात अभिनेत्री असिनच्या मित्राची भूमिका साकारली होती. 

विशाल भारव्दाज या सिनेमातून प्रेक्षकांना सरप्राईज द्यायला तयार झाला आहे. विशाल म्हणाले, आम्हाला आधीपासून माहिती आहे की, सान्या मल्होत्रा आणि राधिका खूप चांगल्या अभिनेत्री आहेत.

विशाल भारव्दाज गँगस्टार सपना दीदीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा घेऊन येतो आहे. हुसेन जायेदीचे पुस्तक "माफिया क्वीन ऑफ मुंबई" ह्यावर आधारित असून ही एक सत्यघटनावर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. रहिमा खानची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार होती. इरफान खानदेखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता. इरफान यात दाऊदची भूमिका साकारणार होता. मात्र इरफानला उपचारासाठी परदेशी रवाना झाल्याने सिनेमाचे शूटिंग रखडले. 

Web Title: Vishal Bharadwaj's 'Patacha' shoot complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.