Vikram Bhatt reveals; Sushmita Sen and marriage with Ameesha Patel got married life! | विक्रम भट्टचा खुलासा; सुष्मिता सेन अन् अमीषा पटेलबरोबरच्या अफेअरमुळेच वैवाहिक जीवन झाले उद््ध्वस्त!

माणूस चांगला असो की वाईट त्याने केलेल्या कृत्याचा त्याला आज ना उद्या पश्चाताप होतच असतो. असेच काही दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याबाबतीत झाले आहे. खरं तर विक्रम भट्ट हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध असा चेहरा आहे. कारण त्यांच्याकडे प्रसिद्धी, पैसा, यश अशा सगळ्याच गोष्टी आहेत. मात्र अशातही ते एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण त्यांना आता पश्चाताप होत आहे की, ते त्यांच्या पत्नीला का गमावून बसले?

कित्येक वर्षांनंतर विक्रम भट्टने आपल्या वादग्रस्त नात्याविषयीचा उलगडा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान विक्रमने मान्य केले की, त्यांचे अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अमिषा पटेल यांच्याशी एक्स्ट्रा मेरिटल अफेयर होते. सुष्मितासाठी तर त्यांनी आत्महत्यादेखील करण्याचा प्रयत्न केला होता. विक्रम भट्ट यांनी सांगितले की, ‘सुष्मिता सेन हिच्याशी असलेल्या अफेअरमुळे लहानपणाची मैत्रिण आणि पत्नी आदिती हिच्याबरोबरचे नाते तुटले. आज मला त्याचा खूप पश्चाताप होतो. जेव्हा हे नाते तुटले तेव्हा मी घराच्या बाल्कनीमधून उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला होता.  

पुढे बोलताना विक्रमने म्हटले की, हे सर्व काही सुष्मितामुळे झाले होते. तिच्यामुळेच मी माझ्या आयुष्यातील ऐवढा मोठा निर्णय घेतला. माझा घटस्फोट झालेला होता. माझा ‘गुलाम’ हा चित्रपट रिलीज होणार होता अन् मी फक्त सुष्मिताचा बॉयफ्रेण्ड होतो. त्यावेळी मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी माझ्या मुलीला वेड्यासारखे मिस करीत होतो. कारण मी माझे आयुष्य उद््ध्वस्त केले होते. विक्रमने पुढे सांगितले की, कोणत्याच नात्याने माझे आयुष्य उद््ध्वस्त केले नाही, कारण मी स्वत:च एक उद््ध्वस्त व्यक्ती होतो. विक्रमने केलेल्या चुकांचा त्यांना आजही पश्चात होतो. त्यामुळेच त्यांनी ठरविले की, आता पुन्हा लग्न करायचे नाही. कारण लग्नासारख्या नात्यावरून त्यांचा विश्वास उडाला आहे. 
Web Title: Vikram Bhatt reveals; Sushmita Sen and marriage with Ameesha Patel got married life!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.