Video: Sushmita Sen learning Kathak | Video:कथ्थक डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत, व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव
Video:कथ्थक डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत, व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव

प्रत्येकाला काही ना काही छंद किंवा आवड असते. सर्वसामान्य असो किंवा मग सेलिब्रिटी, सगळेच आपला छंद आणि आवड जोपासताना पाहायला मिळतात. अभिनेत्री सुष्मिता सेनलाही अभिनयाव्यतिरिक्त डान्सची आवड आहे. सोशल मीडियावर आपले काही डान्स व्हिडिओज तिने शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये सुष्मिता पांढ-या  रंगाच्या ड्रेसवर बांधणीची ओडणीसोबत ती कथ्थकचा सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांचे खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. व्हिडिओमध्ये  सुष्मिता डान्स शिकण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती गेल्या 25 वर्षांपासून कथ्थक शिकतेय. तिचा हा डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून अभिनयासह कथ्थक डान्समध्ये सुष्मिता पारंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमुळे अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी सुष्मिताने आपलं वेगळेपण जपल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सध्या सुष्मिता मॉडेल रोहमन शॉल याच्या प्रेमात आकंठ बुडालीय. गेल्या काही महिन्यांत दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही दोघांच्या प्रेमाला बहर आला आहे. एकंदर काय तर हे प्रेम कुणापासूनही लपून राहिलेले नाही. आता सुश्मिताने आपल्या बॉयफे्रन्डचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या दोघांच्या लग्नाच्या चचार्ही सुरू झाल्या आहेत. लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सुश म्हणतेय. पण एकीकडे ती लग्नाची शक्यता नाकारत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट लग्नाचे संकेत देत आहेत.

English summary :
Sushmita sen has been working hard to learn dance. She has been teaching Kathak for the last 25 years. Her dancing video is very viral on social media


Web Title: Video: Sushmita Sen learning Kathak
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.