अभिनेत्री बनणार का संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 20:13 IST2018-07-13T19:26:55+5:302018-07-13T20:13:45+5:30

सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. अनेक स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. पण एका अभिनेत्याच्या मुलीला मात्र आताश: अभिनयात जराही रस उरलेला नाही.

is trishala dutt going to join bollywood she gave reply on social media | अभिनेत्री बनणार का संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त?

अभिनेत्री बनणार का संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त?

सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. अनेक स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. पण एका अभिनेत्याच्या मुलीला मात्र आताश: अभिनयात जराही रस उरलेला नाही. होय, तिचे नाव आहे, त्रिशाला दत्त. संजय दत्तची लाडकी मुलगी. एक काळ असा होता, जेव्हा त्रिशालाही बॉलिवूडचे वेध लागले होते.

बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची तिची इच्छा होती. खुद्द संजय दत्तने एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. ‘मी त्रिशालाला एका चांगल्या कॉलेजमध्ये भरती करण्यासाठी बरीच ऊर्जा आणि वेळ खर्च केला आहे आणि तिनेही खूप चांगली प्रगती केली आहे. फॉरेन्सिक सायन्समध्ये तिने स्पेशलायझेशन केलेय. एकेकाळी तिला बॉलिवूडमध्ये यायचे होते आणि मी तिला तसे न करण्याबद्दल बजावले होते,’ असे संजयने सांगितले होते. पण आता कदाचित त्रिशालाची स्वत:चीच बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा उरलेली नाही.

 होय, काल-परवा इन्स्टाग्राम स्टोरीवर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तिने हेच सांगितले. बॉलिवूडमध्ये येणार का? एखादी चांगली आॅफर आली तर स्वीकारणार का? असे प्रश्न चाहत्यांनी तिला विचारले. पण त्रिशालाने या सर्व प्रश्नांना ‘नो’ असे स्पष्ट उत्तर दिले. आई-वडिलांशिवाय अमेरिकेत एकटे राहणे, कसे वाटते? यावर त्रिशाला म्हणाली, ‘मला वाटतेय, आता सगळे ठीक आहे. मी कधीच त्यांच्यासोबत राहिले नाही. राहिलीयं पण तेव्हा मी खूप लहान होते. त्यामुळे त्यांच्याशिवाय राहणे कसे असते, हे मला सांगता येणार नाही ’.

संजय दत्तची मुलगी म्हणून तुला काय वाटते, असा प्रश्न एका युजरने तिला केला. यावर ‘प्रामाणिकपणे सांगू तर ही माझ्यासाठी अतिशय सामान्यबाब आहे. अन्य वडिलांसारखाच तो आहे़ त्याच्यासोबत असताना मी माझ्या बाबासोबत आहे, असेच मला वाटते. अन्य कुठलेही विचार माझ्या डोक्यात येत नाहीत,’ असे ती म्हणाली. तुझ्या वडिलांमधला सगळ्यात आवडता गुण कुठला, यावर माझ्या बाबाचा सेन्स आॅफ ह्युमर. तो खूप विनोदी आहे, असे ती म्हणाली.

Web Title: is trishala dutt going to join bollywood she gave reply on social media