सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:19 PM2019-02-08T12:19:54+5:302019-02-08T12:21:11+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय.

Title of Sushant Singh Rajput-Sanjana Sanghi's Kizie Aur Manny is now changed to Dil Bechara | सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘फॉल्ट इन स्टार्स’ या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय. आता हा चित्रपट ‘दिल बेचारा’ नावाने प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत याबाबतची घोषणा केली.
या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत संघना सांघीसोबत दिसणार आहे. संजना सांधीने याआधी ‘फुकरे रिटर्न्स’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘रॉक स्टार’सारख्या चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका केल्यात. पण ‘दिल बेचारा’मध्ये प्रथमच ती लीड रोलमध्ये दिसणार आहे.




मध्यंतरी हा चित्रपट  ‘मीटू’च्या वावटळीत सापडला होता. संजना सांघी सुशांतच्या सेटवरच्या ‘ओव्हर फ्रेंडली’ वागण्याने त्रासल्याची खबर होती. सुशांतच्या गैरवर्तनाला कंटाळून संजनाने हा चित्रपट सोडल्याचेही म्हटले गेले होते. अर्थात ही बातमी निराधार असल्याचा खुलासा सुशांतने केला होता. संजनासोबतचे व्हॉट्स अ‍ॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स शेअर करत, त्याने स्वत:चा बचाव केला होता. यानंतर खुद्द संजनानेही या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हा कुठे हे प्रकरण थंड पडले होते.




सुशांत व संजनाचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण लवकरच याचीही घोषणा होणे अपेक्षित आहे. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘फॉल्ट इन स्टार्स’ या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे मुकेश छाबडा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.
सुशांतबद्दल सांगायचे तर  सध्या ‘सोन चिरैया’, ‘छिछारे’, ‘चंदा मामा दूर के’ असे अनेक चित्रपट त्याच्या हातात आहेत. अलीकडे एका मुलाखतीत बोलताना बारा चित्रपटांवर माझी चर्चा सुरू असल्याचे त्याने सांगितले होते.

Web Title: Title of Sushant Singh Rajput-Sanjana Sanghi's Kizie Aur Manny is now changed to Dil Bechara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.