OMG! सुशांत सिंग राजपूतने डिलीट केल्या इन्स्टावरच्या सर्व पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 11:23 AM2019-03-17T11:23:58+5:302019-03-17T11:24:16+5:30

लवकरच ‘छिछोरा’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण आता सुशांत आपल्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केले आहेत.

sushant singh rajput deletes all his instagram posts fans are shocked | OMG! सुशांत सिंग राजपूतने डिलीट केल्या इन्स्टावरच्या सर्व पोस्ट!

OMG! सुशांत सिंग राजपूतने डिलीट केल्या इन्स्टावरच्या सर्व पोस्ट!

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट यावर्षी २९ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात संजना सांघी त्याच्या अपोझिट दिसणार आहे.

सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडचा एक उत्तम अभिनेता आहे. ‘एमएस धोनी’, ‘राबता’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि अलीकडे प्रदर्शित झालेला ‘सोनचिडिया’ अशा अनेक चित्रपटांतील  सुशांतचा अभिनय प्रेक्षकांना भावला. लवकरच ‘छिछोरा’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण आता सुशांत आपल्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केलेत. सुशांतने असे का केले, हे कळायला मार्ग नाही. साहजिकच त्याचे ७८ लाख फॉलोअर्स त्याच्या या कृतीमुळे धक्क्यात आहेत.




 इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांशी संवाद साधणार नाही, असे लिहुन सुशांतने त्याच्या सर्व पोस्ट काढुन टाकल्या. यामागचे कारण मात्र, त्याने सांगितले नाही. इन्स्टाग्रामवर सुशांतला लाखो चाहते फॉलो करत होते. सुशांतने अचानक  इन्स्टाग्रामला रामराम ठोकल्यामुळे त्याचे चाहते निराश झालेत. 




सुशांतने असे का केले, यावरून तूर्तास बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. सुशांतचा  ‘सोनचिडिया’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरला त्यामुळे त्याने इन्स्टाग्रामवरून पोस्ट डिलीट केल्या असा कयास लावला जात आहे. अर्थात असे सुशांतने पहिल्यांदा केलेले नाही. यापूर्वीही इन्स्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट त्याने डिलिट केल्या होत्या. 
सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट यावर्षी २९ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात संजना सांघी त्याच्या अपोझिट दिसणार आहे. तत्पूर्वी येत्या आॅगस्टमध्ये त्याचा ‘छिछोरे’ रिलीज होतोय.या सिनेमात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा व सुशांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 

Web Title: sushant singh rajput deletes all his instagram posts fans are shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.