​करेनजीतमध्ये मांडले जाणार सनी लियोनीचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:52 AM2018-03-12T10:52:14+5:302018-03-12T16:22:14+5:30

सनी लियोनी हे नाव बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आले. सनी पॉर्नस्टार असूनही बिग बॉसच्या घरात तिचा प्रवेश झाला ...

Sunny Leoni's life to be presented in Karenjeet | ​करेनजीतमध्ये मांडले जाणार सनी लियोनीचे आयुष्य

​करेनजीतमध्ये मांडले जाणार सनी लियोनीचे आयुष्य

googlenewsNext
ी लियोनी हे नाव बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आले. सनी पॉर्नस्टार असूनही बिग बॉसच्या घरात तिचा प्रवेश झाला होता. बिग बॉसमुळे तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने जिस्म २ या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर शुटआऊट अॅट वडाळा, रागिनी एमएमएस २, हेट स्टोरी २, सिंग इज ब्लिंग यांसारख्या चित्रपटात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. यातील तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सनी लियोनी ही एक आयटम गर्ल म्हणून देखील ओळखली जाते. सनी लियोनीवर चित्रीत करण्यात आलेले बेबी डॉल साँग तर खूपच गाजले होते. सनीने जिस्म २ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी या चित्रपटाच्या काही वर्ष आधीच तिला बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली होती. पण काही कारणाने त्यावेळी तिचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होऊ शकला नाही. कलयुग हा मोहित सुरीचा चित्रपट तिला ऑफर करण्यात आला होता. पण सनीने जास्त पैसे मागितल्यामुळे ती डील फिस्कटली आणि या चित्रपटासाठी दुसऱ्या नायिकेची निवड कऱण्यात आली. कलयुग या चित्रपटानंतर जवळजवळ सात वर्षांनी आपल्याला सनीला बॉलिवूडच्या चित्रपटात पाहायला मिळाले. 
सनीचे खरे नाव हे करणजीत कौर वोहरा असून ती एक पंजाबी आहे. तिला लहानपणापासूनच बॉलिवूडचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. आमिर खान हा तिचा आवडता अभिनेता असून त्याचा दिल हा चित्रपट पाहिल्यावर ती त्याच्यावर फिदा झाली होती. आज सनी ही तिच्या गाण्यांसाठी, नृत्यांसाठी ओळखली जाते. पण सनीने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा वेगवेगळ्या स्तरातून विचित्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या होत्या. पॉर्नस्टार बॉलिवूडची अभिनेत्री कशी काय बनू शकते असे त्यावेळी अनेकांचे म्हणणे होते. तसेच तरुण पिढीला बिघडवण्याचे खापर तिच्या माथी फोडले गेले, पण तरीही ती डगमगली नाही आणि मेहनत, कष्ट करून ती बॉलिवूडमध्ये चांगलीच रुळली. 
गेल्या काही दिवसांत तर सनी लिओनीने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे. काही दिवसांपूर्वी सरोगसीने जुळ्या मुलांची आई झाल्याची बातमी तिने सोशल मीडियावरून दिली आणि तो धक्का पचतो न पचतो तोच तिने आपल्या 'करेनजीत' या चरित्रपटाची घोषणा केलीय. ही घोषणा करताना तिने 'मी कॅनडातून भारतात का आले? मी माझे सनी हे नामकरण का केले? माझे आयुष्य कसे होते' या सगळ्या प्रश्नांची उत्तरे करेनजीत या माझ्या झी ५ वरील चित्रपटात मिळतील असे सांगितले आहे. सनीमागची एक स्त्री कशी आहे हे प्रेक्षकांना या चरित्रपटांद्वारे कळेल असेही तिने म्हटले आहे. झी ५ या नव्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील तिच्या चरित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

Also Read :  न्यु इयर पार्टीत परफॉर्म करण्यासाठी सनीने घेतले तब्बल एवढे कोटी

Web Title: Sunny Leoni's life to be presented in Karenjeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.