‘भावा’ची किडनी निकामी, सनी लिओनीने सोशल मीडियावर मागितली मदत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:18 PM2018-08-09T20:18:35+5:302018-08-09T20:18:58+5:30

सनी लिओनी सध्या तिच्या बायोपिक सीरिजमुळे चर्चेत आहे. सध्या सनीला मदत हवी आहे. अर्थात स्वत:साठी नाही तर भावासारख्याचं एका क्रू मेंबर्ससाठी. 

Sunny Leone's brother prabhakar kidney worsen, sunny ask for Help | ‘भावा’ची किडनी निकामी, सनी लिओनीने सोशल मीडियावर मागितली मदत!!

‘भावा’ची किडनी निकामी, सनी लिओनीने सोशल मीडियावर मागितली मदत!!

सनी लिओनी सध्या तिच्या बायोपिक सीरिजमुळे चर्चेत आहे. सध्या सनीला मदत हवी आहे. अर्थात स्वत:साठी नाही तर भावासारख्याचं एका क्रू मेंबर्ससाठी. किडनी निकामी झाल्याने सनीचा हा मानलेला भाऊ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रभाकर असे त्याचे नाव डॉक्टरांनी त्याला त्वरित किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. प्रभाकरचे संपूर्ण कुटुंब एकट्याच्या कमाईवर अवलंबून आहे. पण आता तोच मृत्यूंशी झुंज देत आहे. गेल्या वर्षभरापासून सनी त्याच्या उपचाराचा खर्च करतेय. पण पुढील उपचारासाठी बऱ्याच पैशांची गरज आहे. त्यामुळे सनीने आपल्या चाहत्यांना प्रभाकरच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनीने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने प्रभाकरला आर्थिक मदत करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. ‘प्रभाकर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. मी शूटींगवर असताना तोच माझ्या टीमची आणि मुलांची काळजी घेतो. माझ्या मुलांसाठी तो मामासारखाच आहे. काही दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडली. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण येथील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे त्याची किडनी निकामी झाली. आता त्याच्यावर तातडीने किडनी प्रत्याारोपण शस्त्रक्रिया करायची आहे. आम्हाला प्रभाकरच्या प्रकृतीबद्दल कळलं आणि आम्ही त्याला योग्य रूग्णालयात भरती केले. पण किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे आणि यासाठी ब-याच पैशांची गरज आहे. प्रभाकरला हा खर्च पेलवणारा नाही. त्यामुळे त्याला आर्थिक मदत करावी, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

Web Title: Sunny Leone's brother prabhakar kidney worsen, sunny ask for Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.