Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:48 PM2018-09-29T12:48:25+5:302018-09-29T13:04:51+5:30

मेक इन इंडियाच्या थीमवर आधारित अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा सुई-धागा सिनेमा गत शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Sui Dhaaga Box Office Collection: Anushka Sharma and Varun Dhawan are the hits at the box office on the first day | Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट

Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट

googlenewsNext
ठळक मुद्देसिनेमाच्या प्रमोशनमध्ये अनुष्का आणि वरुणने कोणतीच कसर सोडली नाहीभारतातल्या 2,200 स्क्रिनवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे

मेक इन इंडियाच्या थीमवर आधारित अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा सुई-धागा सिनेमा गत शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाला 8. 5 कोटींचे ओपनिंग मिळाले आहे. विकेंडला हा सिनेमा आणखीन चांगला गल्ला जमावले.   

सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अनुष्का आणि वरुणने कोणतीच कसर सोडली नाही. भारतातल्या 2,200 स्क्रिनवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.  ‘सुई-धागा’ या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत. ‘सुई-धागा’ या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत.  या सिनेमात एका दाम्पत्याची कथा सांगण्यात आली आहे. जे अनेक खस्ता खात स्वत:चा व्यवसाय सुरु करतात. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा ममता(अनुष्का) आणि मौजी(वरुण धवन) यांची आहे. मौजी हा लहान-मोठी नौकरी करत असतो, त्याला मालकाकडून अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागतो. तर ममता गृहिणी आहे. नवऱ्याच्या सततच्या अपमानामुळे व्यतित ममता त्याला नोकरी सोडून स्वत:चे काम करण्याचा सल्ला देते. मौजी नोकरी सोडतो आणि शिलाईचा व्यवसाय उघडतो. यामध्ये ममता त्याला खूप प्रोत्साहन व सहकार्य करताना दाखवली आहे. 
 

Web Title: Sui Dhaaga Box Office Collection: Anushka Sharma and Varun Dhawan are the hits at the box office on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.